राजकिय

पाथरवाला विविध कार्यकारी सेवा सोसायटी च्या चेअरमन पदी सुरेश खाटीक तर व्हाईस चेअरमन पदी हरिष खाटीक यांची बिनविरोध निवड…..

पाथरवाला विविध कार्यकारी सेवा सोसायटी च्या चेअरमन पदी सुरेश खाटीक तर व्हाईस चेअरमन पदी हरिष खाटीक यांची बिनविरोध निवड…..

कुकाणा प्रतिनिधी -नेवासा तालुक्यातील महत्वाची असणारी पाथरवाला येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी ची नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली, यात ज्ञानेश्वर शेतकरी ग्रामविकास पॅनल च्या वतीने बहुमत सिद्ध करण्यात आले, या ज्ञानेश्वर शेतकरी ग्रामविकास पॅनल च्या वतीने सुरेश रामनाथ खाटीक यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली तर व्हाईस चेअरमन पदी हरिष रामकिसन खाटीक यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

नवीन संचालक मंडळात संतोष बबन खाटीक, प्रमोद रामनाथ खाटीक, कचरू भाऊराव खाटीक, श्रीधर गणपत थोरे, पावलस शंकर पावसे, नानासाहेब गंगाधर खाटीक, ताराबाई साहेबराव खाटीक, विजय एकनाथ थोरे, मालन पांडू फुलमाळी, रामेश्वर भाऊसाहेब गवळी, दत्तात्रय गोसावी यांचा समावेश आहे,
या निवडणूक प्रक्रियेचे काम निवडणूक अधिकारी नांगरे यांनी पाहिले, ज्ञानेश्वर शेतकरी ग्रामविकास पॅनल विजयी करण्यासाठी तंटामुक्ती चे अध्यक्ष रामनाथ खाटीक, दत्तात्रय खाटीक, रावसाहेब विनायक खाटीक, साहेबराव थोरे, अर्जुन खाटीक, मा. सरपंच दत्तात्रय थोरे, उपसरपंच संभाजी खाटीक, पंढरीनाथ खाटीक सर, मधुकर पावसे,( ता. अध्यक्ष पीपल्स पार्टी,)भाऊसाहेब खाटीक,डॉ रमेश खाटीक , डॉ थोरे ,शरद खाटीक , बाळासाहेब खाटीक, बाळासाहेब पावसे,
आदिनी प्रयत्न केले, या निवडी बद्दल महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री शंकराव गडाख यांनी नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!