महाराष्ट्र

नेवासा तहसील कार्यालयास कासार समाजाच्या वतीने निवेदन.

नेवासा तहसील कार्यालयास कासार समाजाच्या वतीने निवेदन

सोनई    – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

निवघा (जि.नादेड) येथे झालेल्या दुर्दैवी घटनेतील पिडीत कुटुंबाला न्याय देऊन पास्को अंतर्गत आरोपीस कठोर शिक्षा व्हावी याकरीता नेवासे तालुका सोमवंशी क्षत्रिय कासार समाजाच्या वतीने नेवासे तहसील कार्यालयात मागणीचे निवेदन देण्यात आले. घटनेचा जाहीर निषेध करण्यात येऊन मुख्यमंत्री, गृहमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. संतप्त कासार समाज बांधवांनी नेवाशाचे
नायब तहसीलदार डि एम भावले यांना निवेदन देऊन आपली भावना व्यक्त केली. यावेळी श्रीधर कुंभकर्ण,प्रफुल्ल पाथरकर,संतोष कुंभकर्ण,योगेश रासने,किरण कुंभकर्ण,कैलास कुंभकर्ण,अनंत रासने,गणेश पाथरकर,अरुण रासने,प्रदीप कुंभकर्ण,बंडु गोसावी,बालू डांगरे व समाज बांधव उपस्थित होते.
निवेदनात केलेल्या मागणीनुसार न्याय मिळाला नाही तर यापुढे राज्यातील सर्व कासार समाज बांधव जिल्हास्तरावर तीव्र आंदोलन करतील असे सोनई येथील व्यावसायिक संतोष कुंभकर्ण यांनी सांगितले.

—————————–

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!