*शेवगांव चे तहसीलदार म्हणुन श्री. प्रशांत सांगडे यांची नियुक्ती*
शेवगांव चे तहसीलदार म्हणुन श्री. प्रशांत सांगडे यांची नियुक्ती
शेवगाव – प्रतिनिधी महाराष्ट्र 7 न्यूज
नवनियुक्त तहसीलदार हे यापूर्वी ते नागपूर येथे तहसीलदार म्हणुन नियुक्त होतें बऱ्याच दिवसांनी शेवगांवला मेरिटचे आणि पूर्णवेळ तहसीलदार मिळाल्याने लोकांची शिव रस्ता शेत रस्ता केस इत्यादी 42 ब 44 ड 155 च्या पेंडिंग केसेस निपटारा होण्यास मदत होईल त्यांची शांत शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष म्हणुन महसुल खात्यात ओळख आहे. त्यांच्यासमोर शेवगांव मध्ये अनेक आवाहने आहेत अवैध बेसुमार { वाळु मुरूम दगडं खडी } गौण खनिज वाहतुक महसुल चे काही भ्रष्ट कर्मचारी “प्लॉटिंग क्षेत्रात झालेले यापूर्वीचे घोळ बोगस गुंठेवारी बोगस तहसीलदार येणे” शेवगांव तालुक्याचा लहरी निसर्ग आणि स्वस्त धान्य वितरण इष्टांक वाढवून घेणे कार्यलयातील एजंटगिरी थांबविणे अशी डझनभर आवाहने आहेत ते एम.पी.एस.सी. मधुन आल्याने नाठाळांच्या माथी काठी हाणल्याशिवाय राहणार नाहीत अशी सर्वसामान्य शेवगावकरांची अपेक्षा आहे