राजकिय

पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रमासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांना निवेदन..

पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रमासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांना निवेदन

सोनई-   महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

शेतकरी वर्ग शेती धंद्याबरोबरच जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करीत आहे. महाराष्ट्रातील गाया,म्हशींची संख्या लक्षात घेता पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम आवश्यक झाला आहे.तसेच देशात देशी गोवंश संवर्धन सुधारणा कार्यक्रम राबविण्यात यावा अशी मागणी
पशुचिकित्सक सेवादाता असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन केली आहे. आपल्या मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले आहे.

सोनई येथील पशुचिकित्सक असोसिएशनचे मार्गदर्शक डाॅ.नितीन पालवे,अध्यक्ष डाॅ.संतोष लांडे,उपाध्यक्ष अनिल कोरडे, डाॅ.चंद्रकांत होन,डाॅ.राहुल काळे,अभिजित दरंदले,डाॅ. दत्तात्रेय लोहकरे,डाॅ.भिमराज लांडे यांनी नागपूर येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन केंद्रीय बवायीन सिमेन कायद्यात देशी गोवंश संवर्धन व सुधारणा कार्यक्रम हाती घ्यावा व महाराष्ट्रात अनेक वर्षापासून बंद असलेला पशुवैद्यकीय पदविका अभ्यासक्रम सुरु करण्याची मागणी केली.

सध्या ग्रामीण भागात खाजगी डाॅक्टर अहोरात्र पशूसेवा देत आहेत. हेच काम अधिक विश्वासार्ह होण्यासाठी व भविष्यात येणा-या अडचणी लक्षात घेऊन “डीव्हीएससी” कोर्स आवश्यक असणार आहे. असा महत्त्वपूर्ण मुद्दा सांगितल्यानंतर गडकरी यांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद दिला. असे पशुचिकित्सक सेवादाताचे मार्गदर्शक डाॅ.नितीन पालवे यांनी सांगितले.
————————————

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!