कुकाण्यात ‘कृषि महाविद्यालय भानसहिवरे’ येथील कृषिदूतांचे आगमन..

कुकाण्यात ‘कृषि महाविद्यालय भानसहिवरे’ येथील कृषिदूतांचे आगमन..
कुकाणा प्रतिनिधी – (महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा )
कुकाणा ता.नेवासा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असलेल्या सुलोचना बेल्हेकर समाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्था अंतर्गत कृषी महाविद्यालय, भानसहिवरे येथील ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यक्रमाअंतर्गत कृषिदूतांचे आगमन झाले. या निमित्ताने कुकाना गावाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाअंतर्गत कृषिदुत – दिवाकर शैलेश,डुमरे ऋषिकेश,बांगर अनिकेत,घाडगे अभिषेक, गिड्डे आकाश पुढील दहा आठवडे गावामध्ये राहून विविध प्रात्यक्षिके व उपक्रम राबवणार आहेत. याप्रसंगी गावच्या सरपंच सौ.लताताई ठिठृल अभंग, उपसरपंच सौ.शुभांगी सोमनाथ कचरे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब आगळे , ज्येष्ठ नागरिक आसाराम शिरसाठ, प्रगतीशील शेतकरी भाऊसाहेब शिरसाठ, सदाभाऊ कदम, योगेश काळे, ऋषिकेश शिरसाठ, तुकाराम नवले, गणेश शिरसाठ, नवनाथ रोडगे व इ. ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.पी.ए.तूरभटमट सर तसेच कार्यक्रम समन्वयक- प्रा.एम.आर.माने व कर्यक्रम अधिकारी प्राध्यापक महाजन ,प्राध्यापिका खकाळे ,प्राध्यापक साबळे , प्राध्यापक सोनटक्के यांचे मार्गदर्शन लाभले.