वडाळा बहिरोबा येथे कृषिदूतांचे आगमन..

वडाळा बहिरोबा येथे कृषिदूतांचे आगमन
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील कृषी महाविद्यालयात अंतिम वर्षातील विद्यार्थी प्रविण बोरुडे, प्रथमेश जामकर, शिवसागर दोडके, प्रज्वल काकडे, वैभव चापे, अनिकेत चव्हाण
या कृषी दुतांचे नेवासा तालुक्यातील वडाळा बहीरोबा येथे आगमन झाले, गावाचे सरपंच ललित दादा मोटे, उपसरपंच सचिनदादा मोटे, प्रकश तवले, ज्ञानेश्वर पतंगे यांनी कृषितांचे स्वागत केले
प्राचार्य डॉ. पी. ए. तूरभटमट सर कार्यक्रम समन्वयक एम. आर माने सर प्राध्यापक महाजन सर प्राध्यापिका खखाले मॅडम प्राध्यापक सागर साबळे , प्राध्यापक सागर सोनटक्के इतर विषय शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तीन महिन्यांच्या कालावधीत कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम गावातील पीक पद्धती आधुनिक शेती माहिती
बळीराजाला वित्तीय पुरवठा सहकारी विन संस्थांची कार्यक्रम पद्धती, पीक प्रात्यक्षिके, माती परीक्षण, पाणी व्यवस्थापन, किडरोग नियंत्रण इतर शेतीबाबत माहिती देणार आहे शेतीवा उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आहे.