सर्वसामान्य ग्राहकांच्या पसंतीला उतरलेले मुळा बाजार- डॉ ढगे

सर्वसामान्य ग्राहकांच्या पसंतीला उतरलेले मुळा बाजार- डॉ ढगे
नेवासा -महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
मुळा बाजार मध्ये मिळणाऱ्या किराणामाल व गृह उपयोगी वस्तू यांचे दर रास्त असतात शिवाय मालाची गुणवत्ता वरच्या दर्जाची असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या पसंतीला मुळाबाजार उतरले आहे असा स्पष्ट अभिप्राय प्राचार्य डॉक्टर अशोकराव ढगे यांनी दिला नेहमीप्रमाणे गिऱ्हाईक या नात्याने किराणामाल खरेदी करत असताना डॉक्टर ढगे यांची जनरल मॅनेजर ओंकार दरंदले व कुमारी राधा दीदी शंकरराव गडाख यांची अचानक समोरासमोर भेट झाली तेव्हा डॉक्टर ढगे यांनी मुळाबाजार येथे उपलब्ध असलेल्या उत्तम सुविधा तसेच कर्मचाऱ्यांची सेवा आणि वजन मापातील अचूकपणा याबद्दल कौतुक व प्रशंसा केली ओंकार दरंदले यांनी सर्व बाजार फिरवून दाखवला व मालाचे तुलनात्मक भाव व गुणवत्ता यासंदर्भात सविस्तर माहिती दिली कुमारी राधा दीदी शंकरराव गडाख यांनी मुळा बाजार च्या पुढील वाटचालीबद्दल रूपरेषा मांडताना सांगितले की कर्मचाऱ्यांना नवीन मार्केटिंग तंत्र व व्यवसाय व्यवस्थापन याची प्रशिक्षण तसेच गिफ्ट व इतर विविध योजना राबविण्यात येतील याप्रसंगी देविदास निकम नितीन पवार व कर्मचारी उपस्थित होते……