जगाच्या पाठीवर प्रथमच नर्मदेच्या कुशीत मध्य प्रदेश मध्ये संत कवी महिपती महाराजांच्या भक्त विजय ग्रंथाचे पारायण…

जगाच्या पाठीवर प्रथमच नर्मदेच्या कुशीत मध्य प्रदेश मध्ये संत कवी महिपती महाराजांच्या भक्त विजय ग्रंथाचे पारायण…
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
श्री क्षेत्र ताहाराबाद चे सुपुत्र नर्मदा कृपांकित ह.भ.प.श्री नवनाथ महाराज आहेर व त्यांच्या सुविद्य पत्नी रामायणाचार्य नर्मदा पुराण कथाकार ह.भ.प.सौ सीमाताई महाराज आहेर यांनी अधिकमास निमित्ताचे औचित्य साधून यावर्षी सर्व साधकांना पुण्य संचय व्हावा यासाठी सर्व नर्मदा कृपांकीत वारकरी परिवार गृप यांचे आग्रहास्तव श्री संत कवी महिपती महाराजांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा ज्यांनी आपल्या लेखणीतून सकल संतांना अद्यावत चिरकाल जिवंत ठेवले आहे ते म्हणजे २८८ संतांचे चरित्र करणारे श्री संत कवी महिपती महाराज यांनी लिहून जगासमोर ठेवले आहेत. पुढे महाराजांनी संत कवी महिपती महाराज यांच्या ग्रंथाचे पारायण नर्मदा किनारी करण्याचं महत्त्वपूर्ण कारण सांगितल ते म्हणजे की भक्तविजय ह्या ग्रंथाची मूळ निर्मिती मध्यप्रदेश मधील ग्वाल्हेर या ठिकाणी साक्षात ब्रह्मदेवाचा अवतार असणारे श्री संत नाभाजी यांनी ग्वाल्हेरी भाषेतून केली त्यानंतर संत कवी महिपती महाराजांना जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा कवित्व करण्यासाठी अनुग्रह झाला त्यानंतर महिपती महाराजांनी सकल संत संप्रदाय यांचा अभ्यास करून ती संत चरित्र मराठी भाषेत लिहून प्रत्यक्ष पांडुरंगाला ऐकवत त्यानंतर पांडुरंगाने त्यावर शिक्का मोर्तब करावा मग ते संत चरित्र जगासमोर महाराजांनी ठेवाव असे २८८ संतांची चरित्र संत महिपती महाराजांनी लिहिले संत महिपती महाराजांचे कालांतराने महानिर्वाण झालं निर्वाणानंतर महाराजांची पहिली पुण्यतिथी बरोबर 26 वर्षानंतर अहिल्याबाई होळकरांच्या घराण्यातील दुसरे मल्हारराव यांनी साजरी केली. होळकर घराण्यातील कर्तबगार थोर योद्धा मराठा वीरश्री अहिल्याबाई होळकर यांची समाधी नर्मदा किनारी आहे आणि तीही अगदी नर्मदेच्या किनारी या नर्मदेच्या किनारी त्या अहिल्याबाई होळकरांच्या समोरच काहीतरी ऋणानुबंध म्हणून या संत कवी महिपती महाराजांच्या वाङ्मयातील भक्तविजय ग्रंथाचे पारायण त्या नर्मदा माईच्या साक्षीने अहिल्याबाई होळकरांसमोर ऋणातून उतराई होण्यासाठी या सप्ताहाचं नियोजन आयोजन केले आहे ह.भ.प.श्री नवनाथ महाराज आहेर व सौ.सीमाताई महाराज आहेर हे संत कवी महिपती महाराजांचे वारकरी संप्रदाया मधून कथा कीर्तनातून मोठेपण वाङ्मयाचा प्रचार प्रसार नुसत्या महाराष्ट्रा मध्येच नाही तर परप्रांतात परराज्यातही ठिकाणी ते या वाङ्मयाचा प्रचार प्रसार करत आहेत .त्यांचे सेवा कार्य सुद्धा महाराष्ट्रा बाहेरही राज्यांमध्ये सुद्धा गोर गरीब आदिवासी यांची तर सेवा ते करतच आहेत त्याचबरोबर नर्मदा किनारी नर्मदेची पायी परिक्रमा करणाऱ्या भाविकांसाठी ते त्या ठिकाणी अखंड अन्नक्षेत्र उघडून अन्नदान करत आहेत असे महान कार्य त्यांचं चालू आहे व त्याच धर्तीवर यावर्षी सर्वांना या अधिकमास पर्वणीचा विशेष लाभ व्हावा ,नर्मदेचे स्नान, दर्शन घडावं या हेतूने आयोजन केले असून या सप्तांमध्ये दिनचर्या अशी राहील पहाटे ४ते ६काकडा भजन होईल, ७ ते ११ भक्तविजय ग्रंथाचे पारायण होईल, दुपारी ३ते ५ या वेळेत रामायणाचार्य नर्मदापुराण कथा प्रवक्त्या नर्मदाकृपांकित ह.भ.प.सौ.सीमाताई महाराज आहेर (मैया) यांच्या रसाळ वाणीतून सुश्राव्य संगीतमय नर्मदा पुराण कथा होईल संध्याकाळी हरिपाठ होईल ,नंतर सांय ७ते ९ या वेळेमध्ये मंगळवार दि.८ | ८ | २०२३ रोजी बाल कीर्तनकार ह.भ.प.कु.वैष्णवी ताई नरोडे,बुधवार दि. ९|८|२०२३रोजी ह.भ.प.उषाताई महाराज वाघ, गुरुवार दि.१०|८|२०२३रोजी ह.भ.प. सौ. चंद्रकलाताई महाराज सातपुते ,शुक्रवार दि.११|८|२०२३रोजी ह.भ.प.सौ.हर्षलताई महाराज मगर,शनिवार दि.१२|८|२०२३रोजी ह.भ.प.सौ.सीमाताई महाराज आहेर (मैया),रविवार दि.१३|८|२०२३रोजी ह.भ.प.कु.गौरीताई महाराज गंगावणे ,सोमवार दि.१४|८|२०२३रोजी रामायणाचार्य ह.भ.प. श्री उत्तम महाराज गुंड यांची कीर्तन होतील त्याचप्रमाणे मंगळवार दि.१५|८|२०२३ रोजी सकाळी ८ते१० या वेळेत राघव नर्मदा परिक्रमा व राघव नर्मदा कृपांकित अन्नक्षेत्राचे संचालक ह.भ.प.श्री नवनाथ महाराज आहेर यांचे काल्याचे किर्तन होऊन काल्याच्या महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होणार आहे त्यासाठी महाराजांनी अखंड श्रद्धावान भाविक भक्त यांना आव्हान केले आहे की जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाची शोभा तर वाढवावीच परंतु एक पुण्य संचय करण्याची विशेष संधी या काळामध्ये प्राप्त झालेली आहे तर त्याचा सर्व भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान ह.भ.प.श्री नवनाथ महाराज आहेर ह.भ.प.सौ.सीमाताई महाराज आहेर व संपूर्ण नर्मदा कृपांकित गृप यांनी वारकऱ्यांना,भाविकांना,नर्मदा परिक्रमावाशी यांना केले आहे .