राजकिय

बेलपिंपळगावच्या सरपंच पदी कृष्णा शिंदे. आ शंकरराव गडाखांकडून नवनिर्वाचित सरपंचाचा सन्मान…

बेलपिंपळगावच्या सरपंच पदी कृष्णा शिंदे.
आ शंकरराव गडाखांकडून नवनिर्वाचित सरपंचाचा सन्मान.

नेवासा प्रतिनिधी  – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद गटाचे महत्वाचे गाव असणाऱ्या बेलपिंपळगाव च्या सरपंचपदी कृष्णा अशोकराव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली,
ना शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली असलेली बेलपिंपळगाव ग्रामपंचायत मागील अडीच वर्षांपूर्वी एक हाती तरुणांच्या हातात गावाची सत्ता मिळवली होती त्यात ठरल्या प्रमाणे रोटेशन पद्धतीने पहिले अडीच वर्ष सौ निकिता चंद्रशेखर गटकळ यांनी काम बघितले कार्यकाळ पूर्ण झाल्या नंतर त्यानी 14ऑगस्ट रोजी राजीनामा दिला होता त्या नंतर 11सप्टेंबर रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक अधिकारी बी बी माने व त्यांना सहकारी म्हणून तलाठी रायपल्ली व ग्रामसेवक उदय मिसाळ यांनी काम बघितले सरपंच पदासाठी एकमेव अर्ज कृष्णा शिंदे यांचा आला होता दुसरा अर्ज न आल्याने निवडणूक अधिकारी माने यांनी दुपारी 3 वा शिंदे कृष्णा हे बिनविरोध सरपंच निवडीची घोषणा करण्यात आली त्या नंतर मोठ्या जल्लोषात आनंद उत्सव साजरा करण्यात आला भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली गावाच्या इतिहासात प्रथमच एक तरुणाला सरपंच पदाचा मान मिळाल्याने तरुण वर्ग मोठ्या आनंदात होता या वेळी नूतन सरपंच शिंदे यांनी सांगितले कि आ शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली गावात सगळ्यांना बरोबर घेऊन चांगले काम करणार व जी गावाच्या चांगल्या हिताच्या कामाची संधी मला मिळाली ती योग्य प्रकारे करणार असल्याचे त्यानी सांगितले या वेळी अशोक कारखाना संचालक अमोल कोकणे, मा सभापती वसंत रोटे,रवींद्र शेरकर प स सदस्य, मा सभापती दिगंबर शिंदे, मा सरपंच राजेंद्र साठे, बाळासाहेब तऱ्हाळ , चंद्रशेखर गटकळ, बापूसाहेब औटी, सोसायटीचे अध्यक्ष सुनिल शेरकर, बाळासाहेब शिंदे, संभाजी शिंदे, अशोक शिंदे,राजेंद्र गायकवाड ,प्रा रमेश सरोदे, तंटामुक्ती अध्यक्ष भिमजी साठे, पोलीस पाटील संजय साठे, बाबासाहेब रोटे, विलास सरोदे, कैलास शिंदे, योगेश शिंदे, किशोर गारुळे, वसंत कांगुणे, उपसरपंच गणेश कोकणे, बाळासाहेब शेंडगे, बाळासाहेब शिंदे, किशोर बोखारे , अप्पासाहेब रोटे, भावराव शिंदे, गणेश शिंदे, खंडू रोटे, कैलास गोर्डे, बाळासाहेब सरोदे, प्रमोद बोखारे, निवृत्ती सुरसे, सुभाष सरोदे,सखाहरी शिंदे, बाबासाहेब भांड, बाबासाहेब रोटे,शिवाजी वरघुडे, अरुण वरघुडे, वसंत भद्रे,महेश शिंदे, सोपान गोर्डे, लक्ष्मण शिंदे, बारकू साठे, नानासाहेब शिंदे, अशोक धिरडे, आदी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, आजी माजी पदाधिकारी व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंचपदी निवडीबद्दल कृष्णा शिंदे यांचे आ शंकरराव गडाख युवा नेते उदयन गडाख आदींनी अभिनंदन केले आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!