वडाळा बहीरोबा येथे ग्रामीण कृषी जागरुकता आणि औद्योगिक कार्यानुभव अभियानांतर्गत गावच्य नकाशाबाबत माहिती…

वडाळा बहीरोबा येथे ग्रामीण कृषी जागरुकता आणि औद्योगिक कार्यानुभव अभियानांतर्गत गावच्य नकाशाबाबत माहिती देण्यात आली.
नेवासा प्रतिनिधी – दि.11.(महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा )
-महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्था अंतर्गत कृषी महाविद्यालय भानसहिवरे येथील कृषीदूत प्रविण बोरुडे, शिवसागर दोडके, जामकर प्रथमेश,काकडे प्रज्वल,,चापे वैभव, अनिकेत चव्हाण यांनी ग्रामपंचायतीत गावचा नकाशा तयार करून माहिती दिली. उसरपंच सचिनदादा मोटे, सचिन पतंगे ,बी.डी.मोटे,रमेश पाटील, व गावातील इतर गावकरी उपस्थित होते.या कृषीदूतांना सदर प्रात्यक्षिकांसाठी कृषी महाविद्यालय भानसहिवरे प्राचार्य डॉ.पी.ए.तूरभटमट तसेच कार्यक्रम समन्वयक प्रा.एम.आर.माने व कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक महाजन सर, प्राध्यापिका खकाळे मॅडम ,प्राध्यापक साबळे सर व प्राध्यापक सोनटक्के सर यांचे मार्गदर्शन लाभले.