कृषीवार्ता

माती परीक्षणानुसार खताचे व्यवस्थापन केल्यास जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवणे आणि पिकांचे उत्पादन वाढणे बखर्चाची बचत होण्यास मदत…

ग्रामीण जागरुकता कार्यानुभव व कृषि औद्योगिक कार्यक्रम संपन्न...

नेवासा प्रतिनिधी –

महाविद्यालय भानसहिवरे येथील कृषिदुतांनी वडाळा बहीरोबा येथील शेतकन्यांना माती परीक्षण कसे करावे व त्याचे फायदे या बद्दल माहिती दिली.महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्था अंतर्गत कृषी महाविद्यालय भानसहिवरे

 

येथील कृषिदूत प्रविण बोरुडे, शिवसागर दोडके, जामकर प्रथमेश,काकडे प्रज्वल,,चापे वैभव, अनिकेत चव्हाण यांनी ग्रामीण जागरुकता कार्यानुभव व कृषि औद्योगिक कार्यक्रम २०२३-२४ अंतर्गत नेवासा तालुक्यतील वडाळा बाहिरोबा गावातील शेतकऱ्यांना माती परीक्षण कसे करावे व त्यांचे फायदे काय आहेत याबाबत मार्गदर्शन केले आपण सर्व जण मातीला आपली आई

संबोधतो, त्या आईची काळजी घेणे हे आपल्या सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. मातीचे स्वास्थ्य टिकवणे आणि तिच्या शाश्वत व्यवस्थापनेच्या प्रक्रियेसाठी जागरूकता निर्माण करणे, हा उद्देश जागतिक मृदा दिवस साजरा करण्यामागे आहे. आरोग्यदायक माती ही अलिकडच्या काळात शेतीमध्ये वापरण्यात येणारी भरमसाठ रासायनिक खते,

शहरीकरण आणि उद्योगधंद्यांसाठी करण्यात येणारी जंगलतोड आणि इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु आहे. केवळ एक इंच सुपीक मृदेचा थर तयार होण्यासाठी ८०० ते हजार वर्षांचा कालावधी लागतो. हीच माती आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया आहे. माती परीक्षणानुसार खताचे व्यवस्थापन केल्यास जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवणे आणि पिकांचे उत्पादन वाढणे बखर्चाची बचत होण्यास मदत होते या संदर्भात सविस्तर माहिती

दिली.

तसेच या प्रात्यक्षिकाकरिता कृषीदूतांना कृषी महाविद्यालय भानसहिवरे प्राचार्य डॉ.पी.ए.तूरभटमट तसेच कार्यक्रम समन्वयक प्रा.एम.आर.माने व कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक महाजन सर, प्राध्यापिका खकाळे मॅडम ,प्राध्यापक साबळे सर व प्राध्यापक सोनटक्के सर यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!