मुळा धरणाचे पाणी जायकवाडीत सोडल्यास रस्त्यावर उतरु- अभंग.

मुळा धरणाचे पाणी जायकवाडीत सोडल्यास रस्त्यावर उतरु- अभंग.
भेंडा प्रतिनिधी – ( महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा )
— शासन मुळा धरणाचे पाणी जायकवाडी धरणा मध्ये सोडण्याचे तयारीत आहे. आमच्या हक्काचं पाणी आम्ही जाऊ देणार नाही.त्यामुळे मुळा धरणाचे पाणी जायकवाडीत सोडल्यास शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरु असा इशारा लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी दिला.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ५० व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदिपन कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते व कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.त्यावेळी श्री.अभंग बोलत होते.
श्री. अभंग पुढे म्हणाले की,आज ५० व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्नि प्रदीपन आपण करत आहोत. मंत्रिमंडळ समितीने १ नोव्हेंबर पासून महाराष्ट्र राज्यातील सर्व कारखाने सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. हंगाम सुरु करण्याचे दृष्टीने आवश्यक ती लेबर भरती पूर्ण झालेली आहे. १ नोव्हेबर पासून नियमित गळीत सुरु होईल.यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्यामुळे उस पिकाची परिस्थिती फारशी चांगली नाही, एकरी उत्पादन घटणार आहे. हलक्या जमिनीत वाळवी लागली आहे, त्यामुळे किती दिवस कारखाने चालतील ही मोठी शंका आहे. परंतु आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याकडे १७ लाख टन उसाची नोंद झालेली आहे. वेळेत उस तूटनार असल्याने शंभर टक्के ऊस ज्ञानेश्वरलाच द्यावा.
शेतकी खात्या मार्फ़त घेण्यात येणाऱ्या उस लागवड नोंदित पारदर्शकता व सूसूत्रता यावी यासाठी प्रत्यक्ष शेतावर जाऊन मोबाईल अॅप्प व्दारे नोंदि घेण्यात येणार आहेत. त्याच बरोबर उस गाड़ीचे वजनाचा मेसेज तात्काळ संबधित शेतकऱ्यांचे मोबाईलवर जाणार आहे.
यावेळी कारखान्याचे जेष्ठ संचालक अड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, काकासाहेब शिंदे, प्रा.नारायण म्हस्के, भाऊसाहेब कांगुणे, मच्छिद्र म्हस्के, बबनराव भुसारी, सखाराम लव्हाळे, दीपक नन्नवरे, लक्ष्मण पावसे, विष्णू जगदाळे, अशोक मिसाळ,दादासाहेब गंडाळ,
कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,सचिव रवींद्र मोटे, कामगार संचालक सुखदेव फुलारी, संभाजी माळवदे,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रभाकर कोलते, रामभाऊ जगताप, ज्ञानदेव दहातोंडे, भाऊराव भोंगळे, एकनाथ कसाळ, अॅड हिंमत देशमुख, राजेंद्र ढमढेरे, भगवान धूत, रामनाथ राजपुरे, अॅड. बाळासाहेब शिंदे, लक्ष्मण बनसोडे, भरत वांढेकर, ज्ञानेश्वर फळे भाजिपाला सहकारी खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष – भाऊसाहेब आगळे, उपाध्यक्ष – शेषराव दुकळे,कॉम्रेड बाबा आरगडे, रावसाहेब निकम, कुंडलिक घोरतळे, अशोक मंडलिक, रामजी अंधारे, रमेश दुशिंगे, चंद्रकांत निकम, दिलीप मोटे, मोहन भगत, अनिल मडके, बाळासाहेब कचरे, काकासाहेब काळे, बाळासाहेब साळुंके, जिल्हा बँकेचे भाऊसाहेब चेके, किशोर पाटील, सुधाकर तहकिक, बाळासाहेब धोंडे, दत्तात्रय खाटीक, संभाजी आगळे, मोहम्मद अत्तर, घुले पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव धस, दत्तात्रय काळे,अशोकराव मंडलीक,तुकाराम मिसाळ, डॉ.शिवाजी शिंदे, अजित मुरकुटे, अंबादास कळमकर, भाऊसाहेब चौधरी, रामभाऊ पाउलबुद्धे, उत्तमराव आहेर, अरुण देशमुख, कचरदास गुंदेचा, अंबादास कळमकार, राजेंद्र आढाव, सोमनाथ कचरे , कारखान्याचे तांत्रिक सल्लागार एस.डी.चौधरी, एम.एस.मुरकुटे, महेंद्र पवार, चिफ इंजिनिअर राहुल पाटील, मुख्य शेतकी अधिकारी – सुरेश आहेर, उपशेतकी अधिकारी – नंदकुमार पाटिल,मुख्य लेखपाल – रामनाथ गरड ,भगवान शेंडगे आदी उपस्थित होते.
प्रारंभी संचालक .जनार्दन कदम व सौ.संजीवनी कदम, इंजि.दिपक नवले व सौ.राधा नवले यांचे हस्ते विधिवत बॉयलर पूजा करण्यात आली.
संचालक शिवाजीराव कोलते यांनी आभार मानले