जेऊर हैबती येथील यमाई माता यात्रा उत्सवाची कुस्त्यांच्या हागाम्याने सांगता.

जेऊर हैबती येथील यमाई माता यात्रा उत्सवाची कुस्त्यांच्या हागाम्याने सांगता.
कुकाणा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील यमाई मातेच्या नवरात्र निमित्ताने भरवण्यात आलेल्या यात्रा उत्सवाची कुस्तीच्या हागाम्याने सांगता करण्यात आली.
जेऊर हैबती येथील यमाई माता देवस्थान अतिशय पुरातन असून या देवीपुढे बोललेला नवस पूर्ण होतो अशी भाविकांची श्रद्धा असल्याने नवरात्र उत्सवात या देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून अनेक भाविक येत असतात यापूर्वी देखील मराठी सिनेमा सृष्टीतील निळू फुले, श्रीराम लागू आदींनी या मंदिरास भेटी दिलेले आहेत. नवरात्र निमित्ताने देवस्थान विश्वस्तांकडून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विजयादशमीच्या दिवशी गावातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येते या पालखी मिरवणुकीसाठी संपूर्ण गावाचा सहभाग असल्यामुळे या मिरवणुकीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या यात्रा उत्सवाची कुस्त्यांच्या जंगी हगाम्याने सांगता करण्यात आली हा यात्रा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी देवस्थानचे अध्यक्ष अशोक आप्पा खराडे उपाध्यक्ष अण्णासाहेब म्हस्के , सचिव रावसाहेब खराडे, अण्णासाहेब जावळे, निवृत्ती म्हस्के, अजित खराडे, संदीप ताटे, आबासाहेब रींधे,अशोक ताके यांनी परिश्रम घेतले तर या हगाम्यासाठी सरपंच महेश म्हस्के,ॲड.अजय रिंधे, नानासाहेब खराडे ,ग्रामपंचायत सदस्य महेश ऊगले, काशिनाथ ईटकर, बागडे मामा, रामदास खराडे, यांनी योगदान दिले तर या हगाम्याचे पंच म्हणून ऊपसरपंच गोरक्षनाथ कानडे तसेच संतोष म्हस्के यांनी काम पाहिले