बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ फायदेशीर :- ला. विनोद गाडेकर..

बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ फायदेशीर :- ला. विनोद गाडेकर….
श्रीरामपूर प्रतिनिधी -( महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा )
राहाता सह्याद्री लायन्स क्लबतर्फे प्रेसिडेंट ला. राजेंद्र फंड यांच्या नेतृत्वाखाली दि. 28/10/2023 रोजी राहाता येथे खाजगी विद्युत कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचा जनजागृती व नोंदणी अभियान मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ला. विनोद गाडेकर यांनी या मंडळाच्या विविध योजना यामध्ये बांधकाम क्षेत्रातील कामगारांची सामाजिक सुरक्षा, कामगारांच्या मुलांना शैक्षणिक सहाय्य, त्यांच्या आरोग्याविषयी सहाय्य, आर्थिक सहाय्य, तसेच त्यांच्या कल्याणासाठी विविध उपाययोजनाबाबत माहिती दिली. त्याचबरोबर या मंडळाचे सदस्य होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज भरण्याबाबत दिशा फाऊंडेशनचे फिल्ड ऑफिसर श्री. विलास गाडेकर व ऋषिकेश ठाकरे यांनी मदत केली.
या मेळाव्यास खाजगी विद्युत कामगारांच्या पैकी सुधाकर रणधीर, दत्तू गायकवाड, दिनेश क्षीरसागर, सतीश धनवटे, गंगाधर भुजबळ, गोरख अभंग, गोरख कदम, अंकुश गाडेकर, दीपक परदेशी, अनिल तरकसे, आनंद लहारे, अमोल लांडगे, सुनील गायकवाड, रवी गाढवे, दीपक बनसोडे, प्रदीप सदाफळ, सचिन इंगळे, व्हॉईस प्रेसिडेंट ला. सुनील धाडगे, सेक्रेटरी ला. सागर रोकडे, ला. बापू गायकवाड, ला. सिराज शेख, ला. सुनील काळोखे, ला. सचिन लोढा व इतर हजर होते.