अठ्ठावीस वर्षा नंतर जिजामाताचे सवंगडी जमले पुन्हा एकत्र..

अठ्ठावीस वर्षा नंतर जिजामाताचे सवंगडी जमले पुन्हा एकत्र
भेंडा प्रतिनिधी -: महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
भेंडा बु येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिर प्रांगणात १९९५ साल च्या ‘ बॅच चे दहावीचे माजी विद्यार्थी, सवंगडी तब्बल अठ्ठावीस वर्षांनंतर पुन्हा एकदा जमले एकत्र फक्त व्हॉट सॅप गुपच्या माध्यमातून एक मेसेज पाठवून ६० जण आपल्या जुन्या वर्ग मित्रांना भेटण्यासाठी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी भेंडा येथे आवर्जून हजर राहिले .
पुणे येथील न्यायाधीश – दिनकरराव आरगडे, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते या वेळी व्यासपिठावर पुणे येथील आर टि ओ संदिप मुरकुटे, -उद्योजक – नापुसाहेब नजन, उद्योजक – श्रीधर कासार, उद्योजक – राहुल
वर्पे, डॉ शिवाजी गोरे, डॉ संदिप देशमुख, डॉ रविंद्र गोरे, डॉ गणेश आर्ले, डॉ दिलीप यादव, डॉ नाना थोरे, पत्रकार – नामदेव शिंदे, नितिन वावरे, गणेश लंघे,सचिन पाटिल, आण्णा गव्हाणे, बाळासाहेब झावरे, शेखर जोशी आदी प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते .
प्रारंभी दक्षिण मुखी हनुमान मंदिरात पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरूवात करून अठ्ठावीस वर्षात दिवंगत माजी वि विद्यार्थ्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली
तसेच भारत देशाच्या लष्करात उल्लेखनिय कामगिरी करून सेवा निवृत्त झालेल्या – मेजर विजय काळे व मेजर पोपटराव खराडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला . सामाजिक वेग वेगळ्या उपक्रमातून मित्र परिवारातील गरजूंना आर्थिक मदत करण्याची चर्चा यावेळी करण्यात आली . इतक्या दिवसा नंतर भेट झाल्यामुळे सर्व जण आनंदाने हुरळून गेले होते . खूप गप्पा रंगल्या होत्या प्रत्येकाने आपण करत असलेल्या नोकरी किंवा व्यवसायाची सर्वांना ओळख करून
दिली जेणे करून प्रत्येकाला आपल्या जिवनात काही अडचण भासल्यास मदत करता येईल . पुन्हा एकदा १० वी ची शाळा भरली असे वाटत होते .
न्यायाधिश – दिनकराराव आरगडे यांच्याहस्तलिखित ‘जोडवं ‘ या कादंबरी व आर्ले पाटिल पत संस्थेच्या वतीने सर्वाना दिवाळी निमित्त मिठाईचे वाटप करण्यात आले . त्यानंतर सर्वांना शिंगोरी आमटीचे जेवण देण्यात आले . कार्यक्रमास प्रमोद ए एव्हांडे, श्रीधर मिसाळ, प्रा दादासाहेब बर्डे, सं तराम रोडगे, प्रशांत माळवे,सतिष वर्मा, राजेंद्र मिसाळ, ज्ञानदेव रोडगे, दिगंबर धनक, अरुण खैरे, जनार्दन जावळे, आदिंसह मित्र परिवार उपस्थित होता .