ब्रेकिंगमहाराष्ट्र

गडाख यांचे खंदे समर्थक वाहब भाई शेख यांचे वयाच्या 79 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन….

 

सलाबतपूर गावचे ज्येष्ठ नागरिक तसेच ज्येष्ठ नेते खासदार यशवंतरावजी गडाख  यांचे निकटवर्तीय तसेच  आमदार शंकरराव गडाख  यांचे खंदे समर्थक वाहब भाई शेख यांचे वयाच्या 79 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन….

नेवासा प्रतिनिधी –  महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

सलाबतपुर व सलाबतपुर परिसरातील मा.खासदार यशवंतरावजी गडाख  यांच्या नेतृत्वाखाली एकनिष्ठ काम करणारे आयुष्यभर संघटनेशी व गडाख कुटुंबीयासी एकनिष्ठ राहिलेले तसेच सलाबतपुर सेवा सहकारी सोसायटी व सलाबतपुर ग्रामपंचायतचे मार्गदर्शक तसेच मुळा सहकारी सोसायटीचे व सलाबतपुर ग्रामपंचायत चे मार्गदर्शक तसेच कृषी उत्पादन बाजार समिती नेवासा तालुका खरेदी विक्री संघ आदी संस्थेचे माजी संचालक नेवासा तालुक्यात त्यांनी अनेक पदे भूषवलेली होती.

आदरार्थी बाबा म्हणून सर्वांना सुपरीत होते लहान थोर सर्वांची आपुलकीने वागणारे माननीय आमदार शंकररावजी गडाख साहेब यांच्यावर मनापासून प्रेम करणारे माननीय साहेबांच्या मळ्यात झालेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमात आवर्जून ते उपस्थित होते ज्यांच्यासोबत आमदार शंकरराव गडाख यांनी संवाद साधला होता.

तसेच त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सध्याला सलाबतपुर गावचे सरपंच म्हणून नेतृत्व करत असलेले अझर भाई शेख यांचे ते वडील होते.

त्यांचा आज वृद्ध काळाने दुःखद निधन झाल्याने सलाबतपुर व सलाबतपूर पंचक्रोशीतील परिसरामध्ये दुःखद वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या जाण्याने राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या मागे चार मुली, एक मुलगा पत्नी, सुना, नातवंडे ,पुतणे भाऊ ,असा मोठा परिवार आहे…..
वाहाब शेख यांचा राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये मोठा मोलाचा वाटा होता तसेच वाहाब शेख यांचा राजकीय प्रवास मोठा होता. तसेच त्यांचा मनमिळाव स्वभाव हा सर्वांना आपलेसे करणार आहोत……

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!