आरोग्य व शिक्षण

जिजामाता महाविद्यालयास आयएसओ मानांकन प्राप्त..

जिजामाता महाविद्यालयाचे आय.एस.ओ. नामांकन प्रमाणपत्र हस्तांतरित करतांना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ.नरेंद्र घुले पाटील,सचिव अनिल शेवाळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष लांडगेआदी.

भेंडा प्रतिनिधी –  महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा 

येथील श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयास international accreditation forum या आंतरराष्ट्रीय संस्थेचा आयएसओ 9001-2015 चे प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले . शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ.नरेंद्र घुले पाटील साहेब यांनी हे नामांकन पत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष लांडगे यांचेकडे हस्तांतरित केले.या प्रसंगी शिक्षण संस्थेचे सचिव अनिल शेवाळे साहेब, उपप्राचार्य डॉ.रमेश नवल, उपप्राचार्य डॉ. संभाजी काळे,आय.क्यु.ए.सी. प्रमुख डॉ मधुकर नवगिरे,आय.एस.ओ.समन्वयक प्रा. पांडुरंग देशमुख, कार्यालयीन प्रमुख बंडू घोडेचोर, गायकवाड साहेब उपस्थित होते.2022-23 या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाचे दैंनंदिन कामकाज, कार्यालयीन कामकाज,उपलब्ध साधन सामग्री,शैक्षणिक तसेच विविध क्रीडा प्रकारच्या सुविधा ,ग्रंथालय,प्रयोगशाळा, वसतिगृह ,या सर्व बाबींचे दिल्ली येथील इंद्रप्रस्थ सिस्टीमसर्ट प्राय.लिमीटेड या नामांकित संस्थेमार्फत परीक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे मानांकन प्राप्त झाले आहे.
या नामांकनामुळे महविद्यालयाच्या लौकिकात आणखी एक भर पडली.
आयएसओ संदर्भात समन्वयक म्हणून पदार्थ विज्ञान विभागप्रमुख प्रा.पांडुरंग देशमुख यांनी काम पाहिले. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ.नरेंद्र घुले पाटील, मा.आ. शेखर घुले पाटील, डॉ. क्षितिजभैया घुले पाटील,जेष्ठ विश्वस्त मा.आ.पांडुरंग अभंग, यांचेसह सर्व विश्वस्तांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष लांडगे,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. या मानांकन मिळाल्याबद्दल परिसरातून देखील महविद्यालयाचे कौतुक होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!