गुन्हेगारीब्रेकिंग

दुर्गादेवी मंदिरातील दानपेटी चोरी व घरफोडी करणारे आरोपी जेरबंद;..

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई..

दुर्गादेवी मंदिरातील दानपेटी चोरी व घरफोडी करणारे आरोपी जेरबंद;

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई.

नेवासा प्रतिनिधी –  महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा शहरातील दुर्गा देवी मंदिरातील दान पेटी चोरी करणारे व घरफोडी करणारे 2 सराईत आरोपी 57,500/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.नेवासा शहरात दि.01 जानेवारी रोजी अनोळखी इसमांनी औदुंबर चौक येथील दुर्गादेवी मंदीराचे गेटचे कुलूप तोडुन मंदीरात जावुन 11,000/- रुपये किंमतीची दानपेटी व दान पेटीतील रोख रक्कम चोरुन नेल्या बाबत नेवासा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणण्याचे आदेश दिले होते यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नातून नेवासा नगर पंचायत अंतर्गत शहरात बसविण्यात आलेल्या सीसी टीव्ही कॅमेराची मदत झाली त्यामध्ये शहरातील दुर्गा देवी मंदिरातील दानपेटी चोरून नेणारे आरोपी कैद झाले होते त्यानंतर तपासाची चक्रे फिरवताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,आरोपी आकाश ऊर्फ मलिंगा जगधने रा.गंगानगर याने त्याच्या साथीदारासह सदरचा गुन्हा केला असुन,तो ज्ञानेश्वर कॉलनी मागे काटवनात बसलेला आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन, पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करण्या बाबत सुचना दिल्याने पथकाने सदर ठिकाणी जाऊन दोन संशयीतांना शिताफीने ताब्यात घेतले.त्यानंतर पोलिसांनी अधिक विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची व परिसरात अजून 5 गुन्हे केल्याची कबुली त्यांनी दिली या गुन्ह्या बाबत पथकाने आकाश ऊर्फ मलिंगा कचरु जगधने व विशाल अरुण बर्डे दोन्ही रा.गंगानगर यांना अटक केली आहे सखोल तपास केला असता त्यांनी त्यांचे साथीदार अमर बर्डे व बंटा ऊर्फ सौरभ हे दोन्ही रा. गंगानगर हे असल्याचे सांगितले आहे ते अद्याप फरार आहेत. अटक केलेल्या आरोपींच्या अंगझडतीमध्ये सोन्या चांदीचे दागिने,रोख व विविध कंपनीचे 4 मोबाईल फोन असा एकुण 57,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला.
यातील आरोपी आकाश ऊर्फ मलिंगा कचरु जगधने हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द दरोडा तयारी,जबरी चोरी, घरफोडी,चोरी,गंभीर दुखापत असे गंभीर स्वरुपाचे एकुण 19 गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती.स्वाती भोर ,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे,ज्ञानेश्वर शिंदे,देवेंद्र शेलार,पोलीस नाईक रविंद्र कर्डीले, संदीप दरदंले,फुरकान शेख, किशोर शिरसाठ, जालिंदर माने,बाळासाहेब गुंजाळ,प्रमोद जाधव,चंद्रकांत कुसळकर व अरुण मोरे यांनी केलेली आहे.आम्ही नेवासकर न्यूज साठी अभिषेक गाडेकर,सौरभ मुनोत नेवासा

स्क्रोल-आ.शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नातून नेवासा नगरपंचायत अंतर्गत शहरात लावण्यात आलेल्या सीसी टीव्ही कॅमेराची तपासात मदत.

– दरोडा तयारी,जबरी चोरी, घरफोडी,चोरी,गंभीर दुखापत असे गंभीर स्वरुपाचे एकुण 19 गुन्हे दाखल असलेला आरोपी जेरबंद.

-दुर्गादेवी मंदिराची दानपेटी चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!