आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

पुस्तक आपल्या भेटीला मौलिक विचार व विधायक कृती त्यामुळे शब्दगंधाचा उपक्रम कौतुकास्पद -श्रीमती अश्विनी मते

पुस्तक आपल्या भेटीला
मौलिक विचार व विधायक कृती त्यामुळे शब्दगंधाचा उपक्रम कौतुकास्पद -श्रीमती अश्विनी मते

नेवासा प्रतिनिधी -महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा 

नेवासा. तालुक्यातील म्हसले गावामध्ये फिरते मोफत वाचनालय व पुस्तक आपल्या भेटीला हा शब्दगंध साहित्यिक परिषद शाखा नेवासा यांच्यावतीने कार्यक्रम उत्साहात पार पडला
याप्रसंगी बोलताना जिजामाता विद्यालयाच्या अध्यापिका श्रीमती अश्विनी मते विचार मांडताना
म्हणाल्या की या उपक्रमावर मौलिक विचार आहेत व त्याबरोबर विधायक कृती ची जोड दिल्यामुळे कार्यक्रमाची तात्विक उंची वाढली आहे
त्यामुळे हा उपक्रम कौतुकास्पद आहे ग्रामीण भागामध्ये पुस्तके उपलब्ध करून दिल्यामुळे वाचनासाठी वातावरण निर्मिती होते लोकांच्या हातातील मोबाईल कमी होऊन पुस्तके दिल्यास सामाजिक परिवर्तन होईल असा ठाम विश्वास श्रीमती मते यांनी व्यक्त केला
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच किशोर शिरसाठ विविध सेवा सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब शिरसाठ कल्याण नवले संभाजी शिरसाट दत्तात्रय शिरसाठ व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
शब्दगंध परिषद नेवासा शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर किशोर धनवटे यांनी वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी नेवासा तालुक्यात 100 गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे
माजी कुलगुरू डॉक्टर अशोकराव ढगे यांनी प्रतिपादित केले की मनाचे मशागत वाचनाने चांगली होते नकारात्मक विचार कमी होतात व सकारात्मक विचार आणि मन प्रसन्न होते अज्ञानाचा अंधकार दूर होतो जीवन प्रकाशमय व मंगलमय आनंदी होण्यासाठी वाचनाची आवड महत्त्वाची आहे मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण व त्यासाठी वाचन करा असा सल्ला दिला
याप्रसंगी म्हसले गावचे सरपंच किशोर पाटील यांनी अत्यंत उपयुक्त उपक्रम राबविल्याबद्दल गावामध्ये आर्थिक पाठबळ देण्याचे मान्य करून सर्वांना आश्वासित केले चेअरमन बाबासाहेब शिरसाट यांनी शब्दगंध दिनदर्शिकेचे वाटप केले शब्दगंध चे उपाध्यक्ष पांडुरंग रोडगे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले दिगंबर गोंधळी यांनी संबळ वाजून उत्कृष्ट पोवाडा सादर केला व सर्वांना ऋणनिर्देश व्यक्त केले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!