कृषीवार्ता

सुट्टीच्या दिवशीही तहसील कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर..

रविवार सुट्टीच्या दिवशीही तहसील कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर पीक पाहणी व ॲपची माहिती शेतकऱ्यांना समजावून सांगितली….

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

आज रविवारचा दिवस असून सुट्टीचा दिवस आहे परंतु काही शेतकऱ्याला अडचणी असताना पिक पिक पाहणी ॲपडाउनलोड करून तरीपण शेतकऱ्यांच्या मोबाईल वर पिक पाहणी होत नव्हती.

त्यामुळे तहसीलचे कर्मचारी श्री योगेश मिसाळ यांनी शेतकऱ्याचे संवाद साधून ती पण अॅप वर्जन टू पिक पाहणी कशी करायची त्या संदर्भात अडचणी चर्चा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तहसील कर्मचारी योगेश मिसाळ यांनी केली. त्यांच्या या सुट्टीच्या दिवशी ही रविवारच्या कामामुळे त्यांचे सर्वत्र शेतकरी वर्ग मधून कौतुक केले जात आहे.

परंतु तहसील कर्मचारी योगेश मिसळ यांनाही सोमवार ते शनिवार तहसील कार्यालय मध्ये मोठ्या प्रमाणात काम असतेच परंतु रविवारच्या सुट्टीच्या दिवशी ही इतर घरी शेतीची कामे तसेच घरगुती कामे या रविवारच्या सुट्टी मध्ये कर्मचारी करत असतात परंतु अतिरिक्त पिक पाहणी कामामुळे त्यांची कामे मागे पडले जात आहे याचीही एका बाजूने शहानिशा करणे शासनाला तितकेच गरजेचे आहे.

योगेश मिसळ थेट शिरसगाव येथे संबंधित शिरसगाव येथील ग्रामस्थ तानाजी देशमुख, शिवाजी पोटे, विषणू मिसाळ, राजेंद्र पोटे ,चेअरमन बाळासाहेब देशमुख, सतीश पोटे, विलास लंघे, सुनील लंघे ,गणेश लंघे, यांच्या शेतीच्या बांधावर जाऊन पीक पाहणी करताना पाहावयास मिळत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!