ब्रेकिंगमहाराष्ट्र

देवगड देवस्थानचे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांचे 20 जानेवारीला अयोध्येला प्रस्तान..

देवगड देवस्थानचे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांचे 20 जानेवारीला अयोध्येला प्रस्तान तसेच हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांचे 21 जानेवारीला अयोध्येला प्रस्तान……..

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा 

येत्या 22 जानेवारीला होत असलेल्या प्रभू रामचंद्र भगवंताच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी नगर जिल्ह्यामधून देवगड देवस्थानचे गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज जाणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली भास्करगिरीजी महाराज यांना प्रभू रामचंद्र भगवंताच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा समारंभासाठी (बाबाजींना )निमंत्रित करण्यात आलेले आहे.

तसेच नगर जिल्ह्यामधून हिवरे बाजार आदर्श गावचे सरपंच पोपटरावजी पवार यांना ही राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

आज देवगड देवस्थान येथे येऊन हिवरे बाजारचे सरपंच पोपटरावजी पवार यांनी देवगड देवस्थानचे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्याशी अयोध्येला रामलीला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाण्यासंदर्भात चर्चा केली.

हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मी 21 तारखेला आयोध्याला जाणार असून मला अयोध्या प्रभू रामचंद्र भगवंताच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण पोहोचले आहे.

ते देवगड येथे दत्त भगवंताच्या दर्शनासाठी व गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या भेटीच्यासाठी आले होते. या वेळी त्यांचा देवस्थानच्या वतीने सन्मान करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!