ब्रेकिंगमहाराष्ट्र

देवगडचे राम गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज आज आयोध्यावरून सायंकाळी साडेसात वाजता देवगड येथे होणार आगमन….

देवगडचे राम गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज आज आयोध्यावरून सायंकाळी साडेसात वाजता देवगड येथे होणार आगमन….

देवगड भक्त परिवारामध्ये जल्लोषाचे वातावरण स्वागताची तयारी पूर्ण…….

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा 

आयोध्या येथे कालच झालेल्या प्रभू रामचंद्र भगवान यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देवगड देवस्थानचे गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांना आमंत्रित केले गेले होते काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते रामलाल प्रतिष्ठान सोहळा संपन्न झाला त्यानंतर देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरी जी महाराज हे परतीच्या प्रवासाला निघाले सायंकाळी सात ते साडेसात वाजेपर्यंत ते देवगडावरती पोहोचणार असल्याची माहिती संत सेवक बाळू महाराज कानडे यांनी पत्रकारांना दिली.
तसेच ही बातमी भक्त मंडळांना कळताच क्षणी देवगडावरती आगमनाची जोरदार तयारी गुरुवर्य उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगीरीजी महाराज यांच्या अधिपत्याखाली करण्यात येत आहे.
यावेळी देवगड येथे राममस्वरूप निर्माण झाल्याने देवगड नगरी अवघी गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या चरणदर्शनाची प्रतीक्षेमध्ये आहे तसेच देवगड मध्ये भक्तांची मोठी मांदीआळी पहावयास मिळत आहे तसेच गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांना घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज हे गेले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!