कृषीवार्ता

नेवासा-कृषी दुतांकडून वृक्षदिंडी काढून प्रजासत्ताक दिन साजरा…..

नेवासा-कृषी दुतांकडून वृक्षदिंडी काढून प्रजासत्ताक दिन साजरा…..

नेवासा प्रतिनिधी -महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

कृषी महाविद्यालय सोनई येथील कृषी दुतांनी झाडांचे महत्त्व सांगत व वृक्षदिंडी काढून जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा केला
यावेळी ध्वजारोहण माननीय सरपंच मीनाताई जोजार यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच जीवनराव वंजारे व प्रमुख पाहुणे माजी उपसभापती किशोर भाऊ जोजार हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुनंदा ईधाटे यांनी केले अध्यक्ष सूचना महेश देवतरसे व अनुमोदन संदीप खेसे यांनी केले. सूत्रसंचालन रंगनाथ गुंजाळ यांनी केले.
कृषी महाविद्यालय सोनई येथील प्राचार्य डॉ. हरी मोरे व उप प्राचार्य प्राध्यापक डॉ. सुनील बोरुडे कार्यक्रमआधिकारी कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक डॉ.अतुल दरंदले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत अजिंक्य लिंगायत,अजय वडणे, सुधीर लव्हाट,अनिकेत माळी, एम गणेश, एल राजशेखर यांनी वृक्षरोपण केले. व वृक्ष संवर्धनाचे महत्त्व सांगितले व शाळेतील विद्यार्थ्यांनी दरवर्षी वृक्ष वृक्षांचा वाढदिवस साजरा करावा व वृक्षांची काळजी घ्यावी असे आव्हान केले. यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांचे व कृषिदुतांचे आभार वैभव दिघे यांनी मानले

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!