ब्रेकिंगराजकिय

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.रोहिणी निकम.

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.रोहिणी निकम.

भेंडा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा 

नेवासा तालुक्यातील निर्मलग्राम भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत
सरपंचपदी सौ.रोहिणी नामदेव निकम
या ९ मतांनी विजयी झाल्या आहेत.

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ.उषा लहानू मिसाळ यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवड गुरुवार दि.१ फेब्रूवारी रोजी झाली.अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सौ.सुहासिनी किशोर मिसाळ व सौ.रोहिणी नामदेव निकम
यांचे २ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या पैकी कोणत्याच उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने दुपारी २ वाजता मतदान प्रक्रिया घेण्यात आली.
एकूण १७ पैकी ९ सदस्य मतदानाकरिता उपस्थित होते. वैशाली शिवाजी शिंदे,संगीता गणेश गव्हाणे,संगीता नामदेव शिंदे,रोहिणी नामदेव निकम,अण्णासाहेब विठ्ठल गव्हाणे, पंढरीनाथ रामराव फुलारी,
मंगल अरुण गोर्डे,स्मिता देवेंद्र काळे,
लताबाई यडू सोनवणे या ९ सदस्यानी हातवर करून सौ.रोहिणी निकम यांना मतदान केल्याने त्या सरपंच पदी विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केले.
तर सुहासिनी किशोर मिसाळ,स्वाती अशोक वायकर,सौ.उषा लहानू मिसाळ,
दादासाहेब हौशीरामगजरे, संजय गोरक्षनाथ मिसाळ,माया दत्तू गंगावणे,
कादर अब्दुल सय्यद, दिलीप भास्कर गोर्डे हे ८ सदस्य अनुपस्थित होते.त्यामुळे त्यांना शून्य मते पडली.

कुकाणा मंडलाधिकारी सौ.तृप्ती साळवे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.त्यांना ग्रामविकास अधिकारी रेवनाथ भिसे,तलाठी बद्रीनाथ कमानदार यांनी सहाय्य केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!