आरोग्य व शिक्षण

जिजामाता विद्यालयास आयएसओ मानांकन

जिजामाता विद्यालयास आयएसओ मानांकन

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा 

नेवासा तालुक्यातील श्री.मारुतरावजी घुले-पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास इंटरनॅशनल अँक्रिडेशन फोरम या आंतरराष्ट्रीय संस्थेचे आयएसओ ९००१-२०१५ चे प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ. नरेंद्रजी घुले यांनी हे नामांकन पत्र विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जयश्री सरवदे यांना दिले.
यावेळी शिक्षण संस्थेचे प्रशासकिय अधिकारी प्रा. भारत वाबळे, पर्यवेक्षक प्रा. बाळासाहेब मोटे व प्रा.बाळासाहेब उगलमुगले, प्रा.सुधाकर नवथर, श्री. गोरक्षनाथ म्हस्के, आयएसओ समन्वयक डॉ. राजेंद्र गवळी आदी उपस्थित होते.
विद्यालयाचे दैनंदिन कामकाज, कार्यालयीन कामकाज, उपलब्ध साधन सामग्री, शैक्षणिक तसेच विविध क्रीडा प्रकारच्या सुविधा, ग्रंथालय, प्रयोगशाळा, वसतिगृह सर्व बाबींचे दिल्ली येथील इएमएस सर्टिफिकेशन व रॉयल असेसमेंट प्रा. लि. या नामांकित संस्थेमार्फत परीक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे मानांकन प्राप्त झाले आहे. नामांकनामुळे विद्यालयाच्या लौकिकात आणखी एक भर पडली.आयएसओ संदर्भात समन्वयक म्हणून डॉ.राजेंद्र गवळी यांनी काम पाहिले.
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ. नरेंद्रजी घुले पाटील, मा.आ.चंद्रशेखरजी घुले पाटील, डॉ. क्षितिज घुले, ज्येष्ठ विश्वस्त मा.आ. पांडुरंग अभंग, अॅड देसाई देशमुख, शिक्षण संस्थेचे सचिव अनिल शेवाळे, सहसचिव रविंद्र मोटे यांच्यासह सर्व विश्वस्तांनी प्रशासकिय अधिकारी, प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!