राजकिय

नेवासा सरपंच संघटनेचे विविध मागण्याचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन.

नेवासा सरपंच संघटनेचे विविध मागण्याचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

सोमवार दि.५/२/२०२४ रोजी दु १२ वा पंचायत समिती नेवासा येथे नेवासा तालुक्यातील सर्व सरपंचांची मिटिंग झाली यावेळी गटविकास अधिकारी श्री संजय लखवाल यांना निवेदन देण्यात आले

गटविकास अधिकारी यांनी सरपंच समस्या बाबत चर्चा केली व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले

सरपंच संघटनेच्या मागण्या खालील प्रमाणे होत्या

दलित वस्ती सुधार योजना निधी संदर्भात चर्चा

१५ वा वित्त आयोग खाते तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकेत उघडणे बाबत चर्चा

१५ वित्त आयोग निधीतुन वीज बिल परस्पर कपात न करणे बाबत चर्चा

दुबत्या गायीना ५ रु लिटर दुध अनुदान करिता टॅग लावणे बाबत आरोग्य अधिकारी यांचेशी चर्चा

ग्रामपंचायतीला कृषिसहाय्यकची वेळ ठरविणे बाबत

दलित वस्ती व तांडा वस्ती निधी मिळणेबाबत

प्रशासक काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचा पंधराव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतला मिळणेबाबत

डाटा ऑपरेटरचे पेमेंट डायरेक्ट ग्रामपंचायतने करणे या मागण्याचे निवेदन देणेसाठी नेवासा तालुक्यातील
सरपंच संघटनेचे अध्यक्ष दिनकरराव गर्जे पाटील, उपाध्यक्ष सौ प्रज्ञा प्रकाश सोनटक्के, सचिव शरदराव आरगडे सौंदाळा, सौ मीनाताई किशोर जोजार भानस हिवरा, भाऊसाहेब सावंत चिलेखनवाडी, श्री प्रमोद गजभार कौठा, श्री ज्ञानेश्वर आयनर अमळनेर श्री राधाकिसन लहारे मक्तापूर, सौ रुपाली सातदिवे, सौ पुष्पाताई शिवाजी आढाव हंडी निमगाव,संगीता हरिभाऊ थोरे पाथरवाला सौ वर्षा वैभव नवले भेंडा खुर्द नामदेव गायकवाड खुनेगाव, सौ बेबी जालिंदर नरोडे बोधेगाव श्री कृष्णा शिंदे बेलपिंपळगाव, श्री महेश म्हस्के जेऊर हैबती आदी सरपंच उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!