राजकिय

सामान्य जनता हीच गडाख कुटुंबाची ताकद — जयश्रीताई गडाख

कुकाण्यात विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न.

सामान्य जनता हीच गडाख कुटुंबाची ताकद — जयश्रीताई गडाख
कुकाण्यात विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न.

नेवासा प्रतिनिधी –  महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा 

विकास कामांसाठी निधी मिळवतांना अनेक अडचणी येत आहेत तरी आ शंकरराव गडाख नेवासा तालुक्यातील विकास कामासाठी नेहमीच प्रयत्न करत आहेत सामान्य जनता हीच गडाख कुटूंबाची ताकद असल्याचे प्रतिपादन जयश्रीताई गडाख यांनी केले.
कुकाणा येथे
माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या
मौजे कुकाणा येथील देवगांव रस्ता येथील मज्जित समोर ब्लॉक बसवणे व रस्ता काँक्रिटीकरण करणे 5 लक्ष रुपये
मौजे कुकाणा ते कचरे वस्ती रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ४० लक्ष तसेच कुकाणा जेऊर शिवरस्ता ३३,लक्ष रुपये
या विकास कामाचा लोकार्पण समारंभ
सौ. जयश्रीताई गडाख यांच्या हस्ते पार पडला या वेळी व्यासपीठावर मा उपसभापती राजनंदिनी मंडलिक, सरपंच लताताई अभंग, जेष्ठ नेते भैय्यासाहेब देशमुख, मार्केट कमिटीचे संचालक दौलतराव देशमुख,अशोक मंडलिक, मा. सरपंच एकनाथराव कावरे,बाळासाहेब कचरे माजी उपसरपंच भाऊसाहेब फोलाने, नामदेराव उंडे,अमोल अभंग ,सोमनाथ कचरे, उपस्थित होते.
पुढे बोलताना जयश्रीताई गडाख म्हणाल्या कितीही अडचणी आल्या तरी आ शंकरराव गडाख विकास कामे थांबू देणार नाहीत सर्वांनी सहकार्य करून साहेबांचे हात बळकट करा असे आवाहन ही केले.
या वेळी कारभारी गोर्डे,भाऊसाहेब सावंत, संदीप देशमुख, बाबासाहेब घुले, नानासाहेब खराडे, महेश उगले, अरुण मिसाळ, मुसा इनामदार, मछिंद्र जाधव, बाबासाहेब खराडे, राजेंद्र खराडे, प्रशांत देशमुख, राजेंद्र म्हस्के,बाबासाहेब गोल्हार, समीर पठाण, इकबाल इनामदार, सुभाष चौधरी,अशोकराव गर्जे, शाकीर इनामदार,अजय रिंधे, रखमाजी लिपने, सोपानराव घोडेचोर, जालिंदर तुपे,अशोक भूमकर,गणेश शेटे, योगेश पाटील, सचिन साबळे,
अशोक दरवडे,सिद्धार्थ कावरे,शकूर इनामदार आदिसह कुकाणा ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्तविक अमोल अभंग यांनी केले तर आभार सोमनाथ कचरे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!