महाराष्ट्र

श्री क्षेत्र देवगड संस्थान येथे आज तिरुमाला तिरुपती बालाजी देवस्थानचे(आंध्र प्रदेश) मा.विश्वस्त श्री.शिवा कुमार यांचे देवगड संस्थाच्या वतीने स्वागत

श्री दत्त भगवंताचे,सद्गुरु किसनगिरीबाबा यांच्या समाधीचे,गुरुवर्य महंत भास्करगिरीजी बाबाजींचे व गुरुवर्य महंत प्रकाशानंदगिरी स्वामीजींचे घेतले दर्शन...

 

नेवासा प्रतिनिधी — महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

श्री क्षेत्र देवगड संस्थान येथे आज तिरुमाला तिरुपती बालाजी देवस्थानचे(आंध्र प्रदेश) मा.विश्वस्त श्री.शिवा कुमार यांनी श्री दत्त भगवंताचे,सद्गुरु किसनगिरीबाबा यांच्या समाधीचे,गुरुवर्य महंत भास्करगिरीजी बाबाजींचे व गुरुवर्य महंत प्रकाशानंदगिरी स्वामीजींचे घेतले दर्शन…….

ये वेळी देवगड देवस्थानचे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांना श्री.शिवा कुमार हे त्यांच्या युग तुलसी फाउंडेशन तर्फे हैदराबाद येथे स्वतः चालवीत असलेल्या गोशाळेची माहिती दिली.
ज्यामध्ये १००० पेक्षा जास्त गाई सध्या आहेत ज्या सर्व कत्तलखाण्यापासुन वाचवुन आणलेल्या असून
‘गो मातेला राष्ट्रमाता म्हणून जाहीर करण्यासाठीच्या त्यांनी उभारलेल्या लढ्यात बाबाजींचे आशीर्वाद असावे’ अशी विनंती केली.

गुरुवर्य देवगड देवस्थानचे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज बोलताना म्हणाले की आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे असा विश्वास व्यक्त केला.
आणि मार्गदर्शनपर पुढील वाटचालीस श्री दत्त देवस्थान देवगड परिवारातर्फे शुभेच्छा दिल्या..यावेळी देवगड परीवारातील श्री राहुल ठोंबरे, संतोष रायपुरे उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!