कृषीवार्ता

हरभरा पिक पाहणी व रब्बी हंगाम पिकावरती डॉ.ढगे यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन…….

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुक्यातील मौजे गेवराई येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्यामार्फत हरभरा पिक पाहणी व कृषी शास्त्रज्ञ भेट तसेच रब्बी पिकावर मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सलाबतपुर कृषी मंडळ अधिकारी मनोज सूर्यवंशी होते याप्रसंगी कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांचे मार्गदर्शन झाले

डॉ ढगे म्हणाले की हरभरा पिकासाठी विशाल वाण शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पेरला असून त्याची काळजी आता घेण्यासाठी हरभरा पिक फुलोर्यातून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे यावेळी सर्वात मोठा धोका घाटे अळीचा प्रादुर्भाव होण्याचा असतो शेतकऱ्यांनी त्यासाठी पाहणी करून पाच टक्के निंबोळी अर्क फवारणी करावी व हरभऱ्याला दुसरी पाणी द्यावे
याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक लक्ष्मणराव सुडके यांनी**मागेल त्याला शेततळे व मागील त्याला ठिबक सिंचन संच***यासाठी अर्ज करावेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी सहाय्यक वैभव कदम यांनी परिश्रम घेतले व कृषी सहाय्यक संदीप गायकवाड यांनी सर्वांचे ऋणानुबंध व्यक्त केले गेवराई गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!