आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

जिजामाताच्या माजी विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेत यश.

जिजामाताच्या माजी विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेत यश

भेंडा – ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा 

येथील जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयातील माजी विद्यार्थी कु.जान्हवी कर्डिले हिची सहाय्यक संशोधन अधिकारी वर्ग २ आणि गोरक्षनाथ गोयकर याची कामगार तलाठी पदावर स्पर्धा परीक्षेतून निवड झाली. महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघाने या यशाबद्दल दोघांचा सन्मान केला. याप्रसंगी कु.जान्हवी कर्डिले हिने आपल्या मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, जिद्द,मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास या चतुसूत्रीच्या जोरावर आपण स्पर्धा परीक्षेत नक्कीच यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी पदवीचे शिक्षण घेत असतांनाच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष – गणेश गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य- डॉ शिरीष लांडगे,भेंडा गावचे सरपंच- रोहिणी नामदेव निकम,बंडू वेताळ, बाबासाहेब गव्हाणे, नामदेव शिंदे,प्रा.डॉ.रामदास आर्ले,माजी विद्यार्थी संघाचे सेक्रेटरी प्रा.केशव चेके उपस्थित होते. यावेळी मॉडर्न कॉलेज पुणे येथील डॉ स्नेहल गागरे यांनी सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट या विषयावर व्याख्यान दिले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी,शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. डॉ अशोक सागडे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!