महाराष्ट्रराजकिय

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा मंगळवारी सोनई मध्ये फडकणार……

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा मंगळवारी सोनई मध्ये फडकणार……

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

सध्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येत्या मंगळवारी सोनई येथे येणार असून ते कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्या प्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

सध्याला होत असलेल्या महाराष्ट्र राज्य भर राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात होत असून अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे येणार असून ते नेवासा तालुक्याचे आमदार शंकररावजी गडाख यांच्या मतदारसंघांमध्ये नेवासामध्ये मंगळवारी दाखल होणार असून नेवासा तालुक्यातील सोनई येथे ते कार्यकर्त्यांशी संवाद मेळावा घेऊन कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत नेवासा तालुक्यामध्ये येत्या मंगळवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा भगवा फडकवणार आहेत व कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे.

या कार्यक्रमाच्या जयत तयारी नेवासा तालुक्याचे आमदार शंकररावजी गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सोनई येथे सुरू आहे. या नेवासा तालुक्याच्या दौऱ्यामुळे नेवासा तालुक्यामध्ये आमदार शंकररावजी गडाख यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या पक्षांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण नेवासा तालुकाभर पाहायला मिळत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!