केंद्र पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी साधला थेट संवाद..
गरीब कल्याण संमेलन कार्यक्रम केव्हीके दहिगाव द्वारा संपन्न .

केंद्र पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी साधला थेट संवाद.
गरीब कल्याण संमेलन कार्यक्रम केव्हीके दहिगाव द्वारा संपन्न
अहमदनगर प्रतिनिधी :- श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने द्वारे ‘गरीब कल्याण संमेलन’ या कार्यक्रमाचे आयोजन दि. ३१ मे, २०२२ रोजी नेवासा येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेवासा तालुक्याचे माजी आमदार पांडुरंगजी अभंग तसेच व्यासपीठावर लोकेनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक काशिनाथ नवले, काकासाहेब शिंदे, अशोकदादा मिसाळ, डॉ. ढगे व कृषि विज्ञान केंद्राचे सर्व शास्त्रज्ञ उपस्थित होते.
भारत देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या धरतीवर दि. ३१ मे, २०२२ रोजी संपूर्ण भारत देशात, राज्यांच्या राजधान्यात, जिल्ह्यांच्या मुख्यालयात आणि सर्व कृषि विज्ञान केंद्रा मध्ये ‘गरीब कल्याण संमेलन’ कार्यक्रम साजरा करण्यात आला. शिमला हिमाचल प्रदेश येथील रिज मैदानात आयोजित ‘गरीब कल्याण संमेलन’ कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सहभागी झाले व तेथून त्यांनी देशातील जनतेला संबोधित केली. केंद्र सरकार द्वारा पुरस्कृत किसान सन्मान निधी, पोषण मोहीम, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन-आरोग्य योजना, गरीब कल्याण अन्न योजना, प्रधानमंत्री मातृ-वंदना योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, एक देश एक रेशन कार्ड, जल-जीवन अमृत मोहीम इ. योजनांच्या देशभरातील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी ऑनलाईन थेट संवाद साधला. या कार्यक्रमाच्या वेळी किसान सन्मान निधी योजनेचा अकरावा हप्ता देशभरातील १० कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रु. २१ हजार कोटी वर्ग करण्यात आला.
नेवासा येथे कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने द्वारा आयोजित गरीब कल्याण संमेलन कार्यक्रमासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. केव्हीके दहिगाव-ने चे प्रभारी प्रमुख माणिक लाखे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषि विज्ञान केंद्राच्या सद्य उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी केव्हीके दहिगाव-ने शास्त्रज्ञ सचिन बडधे, दहातोंडे, प्रकाश बहिरट, वैभव नगरकर, अनिल देशमुख व इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजि.राहूल पाटील यांनी केले तर आभार प्रकाश हिंगे यांनी मानले.