मुळा एज्युकेशन सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा संदीप खेडकर व व्हा चेअरमनपदी प्रा अशोकराव लाटे यांची बिनविरोध निवड.

मुळा एज्युकेशन सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा संदीप खेडकर व व्हा चेअरमनपदी प्रा अशोकराव लाटे यांची बिनविरोध निवड.
सोनई प्रतिनिधी- (राहुल राजळे )
मुळा एज्युकेशन सोसायटी सोनईच्या मुळा सहकारी सेवक पतसंस्थेच्या संचालक मंडळाची सन 2021,22 ते 26,27 या कालावधीसाठी निवड मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष युवा नेते उदयन गडाख गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध झाली.
बुध दि 1 जून 2022 रोजी मुळा एज्युकेशन सोसायटी सोनई येथे नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक सपन्न झाली.यामध्ये प्रा डॉ संदीप खेडकर यांची चेअरमनपदी तर प्रा अशोकराव तुवर यांची व्हा चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली.या प्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मुळा एज्युकेशन सोसायटीचे सचिव उत्तमराव लोंढे यांच्या हस्ते पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मुळा एज्युकेशन सोसायटी सचिव उत्तमराव लोंढे,प्रशासन अधिकारी डॉ अशोकराव तुवर,प्रा रावसाहेब सोनसळे यांचेसह नवनिर्वाचित संचालक प्रा बाबासाहेब गडाख,प्रा विलास वीरकर,प्रा बाबासाहेब गडाख,सुधाकर काळे,दत्तात्रय गडाख,मोहन औटी,नवनाथ पवार,वैशाली गाडे,कलिंदा सोनवणे सेवक सोसायटी सचिव अरुण नवले आदी उपस्थित होते.चेअरमन, व्हा चेअरमन व सर्व संचालक मंडळाचे मा खा यशवंतराव गडाख,मंत्री शंकरराव गडाख,प्रशांत गडाख,मा सभापती सौ सुनीताताई गडाख,युवा नेते उदयन गडाख,सचिव उत्तमराव लोंढे,सह सचिव डॉ विनायक देशमुख आदींनी अभिनंदन केले आहे.
चौकट…
मुळा एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष
युवा नेते उदयन गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली मुळा सेवक पतसंस्थेचा कारभार पारदर्शीपणे व सर्व सभासद बांधवांना सोबत घेऊन करू.
संदीप खेडकर चेअरमन,अशोकराव लाटे व्हा चेअरमन.