वडुले सेवा कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी दिनकरराव गर्जे तर उपाध्यक्ष पदी बाळासाहेब पवार यांची बिनविरोध निवड..
पवार यांच्या रुपाने आदिवासी समाजाला उपाध्यक्ष पदाची प्रथमच संधी..

वडुले सेवा कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी दिनकरराव गर्जे तर उपाध्यक्ष पदी बाळासाहेब पवार यांची बिनविरोध निवड.
पवार यांच्या रुपाने आदिवासी समाजाला उपाध्यक्ष पदाची प्रथमच संधी..
कुकाणा (प्रतिनिधी ) :- नेवासा तालुक्यातील आदर्शगाव वडुले येथील सेवा कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी दिनकरराव गर्जे तर उपाध्यक्ष पदी बाळासाहेब पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपद आदिवासी समाजातील बाळासाहेब पवार यांना दिल्याने या संस्थेत प्रथमच उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी देवून या गावाने पुन्हा एक आदर्श निर्माण केला आहे.
या संस्थेच्या संचालकपदाची निवडणुक लोकनियुक्त सरपंच व सेवा संस्थेचे विद्यमान अध्यक्ष दिनकरराव गर्जे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध करून सत्तेची परंपरा कायम राखत या गावाने पुन्हा एक आदर्श निर्माण केला.
संस्थेचे विद्यमान अध्यक्ष दिनकरराव गर्जे यांचे काम सभासद व संस्थेच्या हिताचे असून संस्था कर्ज वाटप व कर्ज वसुली व ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन अनेक विकास कांमाना गती असल्याने ग्रामस्थ व सर्व सभासदांनी पुन्हा एकदा गर्जे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्या गटाच्या पूर्ण तेरा जागा बिनविरोध देऊन या संस्थेवर चौथ्यांदा त्यांना काम करण्याची संधी दिली .
गुरुवार दि .२ रोजी नूतन संचालकांची बैठक संस्थेच्या कार्यालयात निवडणुक निर्णय अधिकारी डी.टी. महाजन यांच्या मार्गदर्शना खाली पार पडली . यावेळी
अध्यक्ष पदासाठी दिनकरराव गर्जे यांच्या नावाची सुचना भिमराज आतकरे यांनी
केली त्यास एकनाथ पवार यांनी अनुमोदन दिले तर उपाध्यक्ष पदासाठी
बाळासाहेब पवार यांच्या नावाची सुचना तुकाराम लेंभे यांनी तर अनुमोदन माहिला प्रतिनिधी सविता भगत यांनी दिले. या दोन्ही पदासाठी एक – एक उमेदवारी अर्ज आल्याने ही निवडणुक बिनविरोध झाल्याची घोषणा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी संस्था सचिव एस. ए. देवढे यांनी केली तर सहाकार्य म्हणून शुभम ढगे यांनी काम पाहिले .
या बिनविरोध निवडी प्रसंगी नूतन संचालक भीमराज आतकरे, राजेंद्र गर्जे, बाळासाहेब पवार, दादासाहेब उमेदळ, तुकाराम लेंभे, एकनाथ पवार, दौलत सरोदे,
अशोक भागवत , रामनाथ गाढे ,रावसाहेब सरोदे, अनिता संतोष ढोकणे व सविता भारत भगत उपस्थित होते . यावेळी नूतन अध्यक्ष दिनकरराव गर्जे व सर्व नूतन संचालकांचा कुकाणा ग्रामपंचायत व नेवासा एकता पत्रकार संघाच्या वतीने उपसरपंच सोमथाथ कचरे व पत्रकार सुनिल पंडित यांनी सत्कार केला तर. यावेळी नूतन अध्यक्ष दिनकरराव गर्जे, उपसरपंच सोमनाथ कचरे , सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष साहेबराव गर्जे , पत्रकार सुनिल पंडित , माजी सरपंच बाबासाहेब आतकरे यांची भाषणे झाली.
‘निवड झालेले सर्व पदाधिकारी व संचालकांचा ग्रामस्थांच्या वतीनेही सत्कार कराण्यात आला. यावेळी माजी सरपंच बाबासाहेब आतकरे , उपसरपंच ज्ञानेश्वर देवढे, युवा नेते सोमनाथ कचरे , साहेबराव गर्जे, संतोष ढोकणे, अँड. प्रसाद गर्जे, कैलास पवार, ज्ञानेश्वर गर्जे, माजी उपाध्यक्ष बाबुराव सरोदे,शिवराम आरोटे, नंदकुमार गर्जे,अशोक लकडे, कैलास गर्जे, जगन्नाथ मासाळ ,बाबासाहेब नरोटे, अजय कल्हापुरे ,विष्णु गर्जे, खंडेराव खाटिक, पांडुरंग लेंभे, किशोर आतकरे, अशोक देवढे, बबन हाळनोर , अमोल शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.भारत भगत उपस्थितांचे यांनी आभार मानले .
॥ चौकट : – वडुले सेवा सहकारी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष दिनकरराव गर्जे यांच्या नेतृत्वा खाली संस्थेची निवडणुक बिनविरोध करून आदिवासी समाजातील माझ्या सारख्या सर्व सामान्य मानसाला उपाध्यक्ष पद देवून सर्व संचालकांनी मनाचा मोठे पणा दाखवून मला काम करण्याची संधी दिली हे माझे मोठे भाग्यच समजतो. असे नूतन उपाध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी सांगितले.
कुकाणा : -आदर्शगाव वडुले सेवा सहकारी संस्थेचे नूतन अध्यक्ष दिनकरराव गर्जे उपाध्यक्ष बाळासाहेब पवार व सर्व नूतन संचालकांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला