मंत्री शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासा नगरपंचायतच्या 35 कर्मचाऱ्यांचा प्रत्येकी 2.5 लक्ष रु उतरवला आरोग्य विमा..
मा .सभापती सौ सुनीताताई गडाख यांच्या हस्ते जिवन विमा संरक्षक कार्ड वाटप...

मंत्री शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासा नगरपंचायतच्या 35 कर्मचाऱ्यांचा प्रत्येकी 2.5 लक्ष रु उतरवला आरोग्य विमा..
मा .सभापती सौ सुनीताताई गडाख यांच्या हस्ते जिवन विमा संरक्षक कार्ड वाटप…
सोनई प्रतिनिधी.-(राहुल राजळे.)
वाढदिवस हा दिवस सामाजिक उपक्रमांनी आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून व्हावा ही भूमिका मंत्री शंकरराव गडाख यांची असते.त्यानुसार मंत्री शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासा येथील नगरपंचायतचे सफाई कामगार यांचा आरोग्य विमा काढून वाढदिवस सामाजिक जाणिवेतून साजरा करू व सदैव शहर स्वच्छतेसाठी कटिबद्ध असणाऱ्या स्वच्छतादुतांची काळजी घेऊ ही संकल्पना अँड
जावेद इनामदार यांनी मा सभापती सौ सुनीताताई गडाख यांचेकडे मांडली त्यांनीही या अभिनव संकल्पनेचे स्वागत केले व स्वतः या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या.
गुरू दि 2 जुन 2022 रोजी नेवासा पंचायत समिती येथे 35 सफाई कर्मचारी यांना प्रत्येकी 2.5 लक्ष रुपये किंमतीच्या जीवन विमा संरक्षक कार्डचे वाटप करण्यात आले.यामुळे सफाई कामगारांना आधार मिळणार आहे.
जीवन विमा संरक्षक कार्डचे वाटप पंचायत समितीच्या मा सभापती सौ.सुनीताताई गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.नेवासा येथील युवा विधी तज्ञ अँड.जावेद इनामदार यांच्या पुढाकाराने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण काम करतात यामुळे शहराला भरीव निधी उपलब्ध होत असून गावच्या विकासासाठी असेच एकोप्याने काम करा व अँड.जावेद इनामदार यांनी सफाई कामगारांसाठी राबविलेला उपक्रम स्तुत्य असा असून मंत्री शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खरी भेट असल्याचे सौ सुनीताताई गडाख म्हणाल्या.याप्रसंगी सतीश पिंपळे , मा उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, मुख्याधिकारी अंबादास गर्कळ, पोपटराव जीरे,नगरसेविका सौ.अंबिका ईरले, मयुर वाखुरे,सौ.सोनल वाखुरे,भाऊसाहेब वाघ, अंबादास ईरले,नगरसेवक संदीप बेहळे,रणजित सोनवणे, जितेंद्र कु-हे,असिफ पठाण याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक अँड.जावेद इनामदार यांनी आलेल्या प्रमुख अतिथींचे नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे स्वागत केले.प्रास्ताविकात त्यांनी स्वच्छता दूत म्हणून काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या हितासाठी जीवन विमा काढून त्यांना संरक्षक कार्ड मंत्री शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन हा उपक्रम राबवला असल्याचे सांगितले.
यावेळी जालिंदर गवळी,विशाल सुरडे,शोएब पठाण इस्माईल जहागिरदार, प्रा सुधीर बोरकर,अल्पेश बोरकर,परशुराम डौले,आयुब जहागिरदार,वसीम शेख,अमजद पठाण,हाजी जमशिद पठाण,अमृत पाटील,नितीन ढवळे,पंकज जेधे,अँड.रमेश पाठे,अँड.मयूर वाखुरे,शोएब पठाण,सोपानराव औटी,बाळू नगरे यांच्यासह नगरपंचायतचे कामगार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी आभार मानले.
नेवासा नगर पंचायत कर्मचारी यांना जिवन संरक्षक विमा कार्डचे वाटप करतांना मा सभापती सौ सुनीताताई गडाख.
चौकट….
मंत्री शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता कर्मचारी यांना जीवन संरक्षक कार्डचे वाटप करण्यात आले हा उपक्रम स्वच्छता कर्मचाऱ्यांना आधार देणारा आहे.
नगराध्यक्षा सौ योगिताताई पिंपळे.