राजकिय

मंत्री शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासा शहरातील दत्त मंदिरास 21 हजार रु देणगी.

आशिष(भैय्या) कावरे व आनंद नांगरे यांचा उपक्रम.

मंत्री शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासा शहरातील दत्त मंदिरास 21 हजार रु देणगी.

आशिष(भैय्या) कावरे व आनंद नांगरे यांचा उपक्रम…

सोनई प्रतिनिधी -(राहुल राजळे.)
मंत्री शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासा शहरातील बाजार तळ येथील दत्त मंदिर बांधकामासाठी संत ज्ञानेश्वर देवस्थान नेवसाचे जनसंपर्क अधिकारी आशिष(भैय्या)कावरे व बहिरवाडीचे सरपंच आनंद नांगरे यांनी मंदिर बांधकामास मदत व्हावी या भावनेतून मंत्री शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासा बाजार तळ येथील दत्त मंदिर बांधकामासाठी 21 हजार रुपयांची देणगी सामाजिक भावनेतून दिली याप्रसंगी नगरसेवक संदीप बेहळे, प्रकाश गुणवंत,गणेश गायकवाड, पटेल आदी उपस्थित होते.
मंत्री शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासा शहर बाजार तळ येथे सुरू असलेल्या दत्त मंदिर बांधकामास आशिष(भैय्या) कावरे व आनंद नांगरे यांनी दिलेली देणगी सर्वांना प्रेरणादायी अशी आहे असे प्रतिपादन संदीप बेहळे यांनी केले.नेवासा येथील दत्त मंदिराच्या बांधकामासाठी देणगी सुपूर्द करतांना आशिष(भैय्या)कावरे व आनंद नांगरे.नेवासा शहर बाजार तळ येथे सुरू असलेल्या दत्त मंदिर बांधकामासाठी आमचे नेते मंत्री शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त फुल न फुलांची पाकळी मदत व्हावी या हेतूने 21 हजार रु मदत केली यापुढेही मंदिर बांधकामासाठी मदत करण्यासाठी प्रयत्नशील राहू.
आशिष(भैय्या)कावरे नेवासा
आनंद नांगरे सरपंच बहिरवाडी

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!