महाराष्ट्र

जवान नवथर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

गडचिरोलीतील गोळीबार प्रकरण..

जवान नवथर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

गडचिरोलीतील गोळीबार प्रकरण

अहमदनगर / कुकाणा – नक्षलवाद्यांशी दोन हात करण्यासाठी तैनात असलेल्या राज्य राखीव दलाच्या जवानाने (एसआरपीएफ) अंतर्गत वादातून आपल्या सहकाऱ्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना अहेरी तालुक्यातील मरपल्ली पोलीस मदत केंद्रात बुधवारी, १ जून रोजी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. जवानावर गोळी झाडल्यानंतर जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे राज्य राखीव दलात एकच खळबळ उडाली आहे. दोघे जवान नेवासा व नगर तालुक्यातील मुळचे रहिवासी

होते. श्रीकांत रावसाहेब बेरड (रा. दरेवाडी, ता. नगर) आणि बी. बी. नवथर

(रा. पिंप्री शहाली, ता. नेवासा) असे शाहिद जवान व मृत्यूमुखी पावलेल्या जवानाचे नाव आहेत. अतिदुर्गम अतिसंवेदनशील मरपल्ली पोलीस मदत केंद्रात बॅरकमध्ये ही घटना घडली. पुण्याहून हे जवान गडचिरोलीमध्ये तैनात झाले होते. राज्य राखीव दलाच्या जवानामध्ये अंतर्गत वादातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बेरड आणि नवथर यांच्यामध्ये अंतर्गत वादातून भांडण झाले होते. त्यामुळे संतापाच्या भरात रायफलमधून श्रीकांत बेरड याने नवथर यांच्यावर गोळी झाडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर श्रीकांत यांनी स्वतःच्या बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केली. दोघेही दौंड पुणे येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या कॅम्पचे जवान होते.

दरम्यान, नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली येथील रहिवासी राज्य राखीव दलाचे जवान बंडू नवथर यांच्यावर

शहीद जवान व आत्महत्या ग्रस्त जवान अनुक्रमे नेवासा व नगर तालुक्यातील मुळचे रहिवासी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहीद नवथर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, तीन चुलते असा परिवार आहे
अंत्यविधीसाठी

राज्याचे कॅबिनेट मंत्री शंकराव गडाख यांच्या कुटूंबातील प्रा. जयश्री गडाख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे,
नेवासा पोलीस निरीक्षक विजय करे, बाबा आरगडे, संजय चव्हाण, अशोक चौधरी, सर्जेराव घाणमोडे, मोहन गहाळ, मेजर आव्हाड, देविदास भेंडेकर, मेजर दरंदले, संतोष घुले, मेजर अंजन चव्हाण, दादा शिंदे, मेजर नागे, रमेश नवथर, मेजर ठोंबळ, मेजर नवथर, मेजर पाचुडे, विष्णु घुले

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नवथर यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली येथे आणण्यात आले. त्यावेळी सैन्यदल व गावकऱ्यांकडून पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी सैन्य दलाकडून हवेत गोळीबार करून मानवंदना देण्यात आली. अंत्यविधीसाठी राजकीय, सामाजिक, शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. शुक्रवारी (दि. ३) सकाळी १० वाजता अंत्यविधी करण्यात आला. अंत्यविधीसाठी गावातील व आदी यावेळी उपस्थित होते.

जवान श्रीकांत बेरड यांच्यावरही अंत्यसंस्कार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!