देश-विदेशब्रेकिंग

7 वर्षापूर्वी वाढदिवसानिमित्त लावलेल्या वटवृक्षाच्या सावलीत केला वाढदिवस साजरा…

7 वर्षापूर्वी वाढदिवसानिमित्त लावलेल्या वटवृक्षाच्या सावलीत केला वाढदिवस साजरा…

बेलपिंपळगाव येथील तरुण कार्यकर्ते करतात वृक्षसंवर्धनासाठी अशीही जनजागृती.

सोनई प्रतिनिधी- (राहुल राजळे.)
हल्ली वाढदिवस म्हटले की मोठं मोठाले केक,डीजे च्या आवाजावर थिरकणारी तरुणाई,मोठं मोठाल्या खानावळी असे चित्र सर्रास पाहण्यास मिळते परंतु बेलपिंपळगाव ता नेवासा येथील तरुणाई अपवाद आहेत.
बेलपिंपळगाव ता नेवासा येथील ना शंकरराव गडाख मित्रमंडळ व प्रशांत गडाख मित्रमंडळाच्या वतीने दररोज गावातील तरुणांचे सामाजिक भान जपत वाढदिवस साजरे केले जातात व गावाच्या एकोप्यासाठी व सामाजिक बांधिलकीसाठी काम केले जाते.
गेल्या 7वर्षांपूर्वी वसंतराव कांगुणे ग्राम प सदस्य बेलपिंपळगाव यांच्या वाढदिवसानिमित्त भर उन्हात वटवृक्षांचे वृक्षारोपन करत वाढदिवस साजरा करण्यात आला होता.
फक्त वृक्षरोपण करूनच वसंतराव कांगुणे थांबले नाही तर त्या वृक्षांचे स्वतः लक्ष देत त्यांनी संगोपनही केले.त्या वटवृक्षाची आज बेलपिंपळगाव येथे डेरेदार सावली निर्माण झाली आहे.याच वटवृक्षाच्या सावलीत आज कांगुणे यांचा मित्रमंडळाच्या वतीने वाढदिवस साजरा करत त्यांच्या वृक्षप्रेमाबद्दल त्यांचे अनोखे अभिनंदन करण्यात आले तसेच बेलपिंपळगाव येथील कार्यकर्त्यांनी स्मशानभूमी परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपन करण्यात आले याप्रसंगी
सरपंच चंद्रशेखर गटकळ ,पंचायत समिती सदस्य रवींद्र शेरकर,
उपसरपंच बाबासाहेब भांड ,तंटामुक्ती अध्यक्ष भिमजी साठे, अमोल कोकणे संचालक अशोक सह सा कारखाना ,चंद्रकांत सरोदे, मा सरपंच राजेंद्र साठे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा शिंदे बंडूपंत चौगुले किशोर गारोळे, पोलीस पाटील संजय साठे सोपान औटी आदी उपस्थित आहे.

बेलपिंपळगाव ता नेवासा येथे वटवृक्षाच्या सावलीत वाढदिवस साजरा करतांना कार्यकर्ते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!