ब्रेकिंग

नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह एक आरोपी जेरबंद नेवासा पोलिसांची धडक कारवाई

दिनांक १७/०५/२०२२ रोजी रात्री १०/०० ते १०/३० वाजचे सुमारास पोलीस स्टेशनला हजर असताना पोनि करे सो यांनी पाहेका गिते, पोना/दहिफळे, पोको शाम गुंजाळ व पोकों रामदास वैद्य असे सर्वांना कळविले की, महिला नामे लताबाई किशोर कुंभकर्ण रा औंदुबर चौक पोस्ट ऑफिस समोर नेवासा खुर्द ता नेवासा यांना त्याचा मुलगा नाम सागर किशोर कुंभकर्ण हा त्यांना व त्यांचीसुन प्रांजल तसेच नात श्रेषा, माही, श्रावणी या सर्वांना विनाकारण लाथाबुक्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देत आहे असे सांगितले आहे तरी तुम्ही सदर ठिकाणी जावून सदर पिडीत महिला व सदर इसमास घेवून पोलीस स्टेशनला या व त्याचेवर कायदेशीर कार्यवाही करा असे आदेश दिलेवरुन पोहेकॉ गिते, पोना दहिफळे पोकों शाम गुंजाळ, पोकों वैदय असे सरकारी गाडीने सदर ठिकाणी गेले असता सदर ठिकाणी ईसम नामे सागर कुंभकर्ण यास ताब्यात घेतले व त्याची आई लताबाई याना तक्रार देण्यास पोलीस स्टेशनला येण्यास कळविले त्यानंतर पोलीस स्टेशन नेवासा येथे आल्यानंतर पोनि सो विजय करे यांनी सागर किशोर कुंभकर्ण यास विश्वासात घेवुनः त्याचेकडे विचारपुस केली असता, त्याने पोलीसांना सांगितले की, मला माझी आई, पत्नी व मुली हे कायम त्रास देतात मी त्यांचा कायमचा काटा काढण्यासाठी एक गावठी कटटा व जिवंत काडतुसे विकत घेतलेले असुन त्यांना मी ठार मारणार आहे. सदर गावठी कटटा व जिवंत काडतुसे मी माझे घराचे तिस-या मजल्यावरील कपाटात लपवुन ठेवलेली आहेत असे सांगितलेत्यांनतर पो. नि करे, पोहेकॉ गिते, पोना दहिफळे. पोका/ शाम गुंजाळ, पोकों वेदय व इसम नामेसागर किशोर कुंभकर्ण असे सर्वजन सरकारी गाडीने त्याचे राहते घराजवळ गेलो तेथे पोहेकॉ गिते यांनी दोन पंचांना बोलावून त्यांना सागर कुंभकर्ण याने सांगितल्याप्रमाणे त्याचे घराचे तिस-या मजल्यावरील बेडरुमध्ये एक गावठी कट्टा व जिवंत काडतुसे काढून देतो असे सांगितले आहे त्याप्रमाणे पंचनामा लिहून देणेस कळविले वरुन सदर पंचांना बरोबर घेवून आम्ही पोलीस स्टाप सागर अशोक कुंभकर्ण याने आम्हांला त्याचे घराचे तिस-या मजल्यावरील बेडरुमध्ये रात्री ११/०० वाजचे सुमारास घेवुन गेला सदर ठिकाणी त्याने त्याचे लाकडी कपाटामधील ड्रावरमध्युन एक गावटी कटटा व ९ जिवंत काडतुसे काढून दिल्याने लागलीच दोन पंचासमक्ष जप्त करुन त्यानंतर पोलीस कॉन्सटेबल ०३ शाम बाबासाहेब गुंजाळ यांच्या फिर्यादवरुन इसम नामे सागर अशोक कुंभकर्ण याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्ह्यांत सागर अशोक कुंभकर्ण याला अटक करण्यांत आलेली आहे…

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला सो, अहमदनगर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सो श्रीम. स्वाती भोर मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप मिटके उपविभाग शेवगांव यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि श्री. विजय करे, पोहेकॉ तुळशीदार गिते, पोना / प्रतापसिंह दहिफळे, पोको शाम गुंजाळ, पोकों/रामदास वैद्य यांनी केली असुन पुढील तपास पोहेकॉ तुळशीदास गिते पोलीस स्टेशन नेवासा हे करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!