ब्रेकिंग

मोक्का व खुनाचा प्रयत्न गुन्ह्यात फरार असलेला सराईत आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

क्रमांक पीआरओ/प्रेसनोट/19/2023 प्रेस नोट दिनांक :- 21/01/2023
————————————————————————————
मोक्का व खुनाचा प्रयत्न गुन्ह्यात फरार असलेला सराईत आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
————————————————————————————
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी श्री. अल्ताफ अल्हाउदीन बागवान, वय 25, रा. गजानन कॉलनी, नवनागापुर, अहमदनगर यांना यातील आरोपी नामे अभिषेक भिंगारदिवे, गणेश काळे, प्रेम नरेंद्र भाकरे, किरण पालवे, नावीन्या भाकरे, दिपक बेरड, आशिष भाकरे सर्व रा. नवनागापुर अहमदनगर यांनी दि.17/03/22 रोजी फोन करुन सेंट मेरी चर्च, नागापुर येथे बोलावुन घेवुन बिअरच्या बाटल्या डोक्यात फोडुन, चाकुने वार करुन जखमी करुन ठार मारण्याचा प्रयत्न केला. सदर घटने बाबत एमआयडीसी पोस्टे गु.र.नं. 178/22 भादविक 307, 143, 147, 148, 149, 504, 506, 120 (ब) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1)(3)/135 व आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती सदर गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा (मोक्का) अन्वये वाढीव कलमांचा 3 (1) (I), 3 (2), 3 (4) अंर्तभाव करण्यात आला होता.
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील मोक्क्यात फरार आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबतचे आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, संदीप पवार, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, दिपक शिंदे, पोकॉ/विनोद मासाळकर, आकाश काळे, मच्छिंद्र बर्डे व चापोहेकॉ/अर्जुन बडे अशा पोलीस अंमलदारांचे पथक नेमुण मोक्का फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. नमुद सुचना प्रमाणे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार नगर तालुका परिसरात पेट्रोलिंग करुन मोक्का फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेत असतांना पोनि/अनिल कटके, स्थागुशा यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, आरोपी नामे संतोष धोत्रे हा गांधी नगर, एमआयडीसी परिसरात येणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने पोनि/अनिल कटके यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविले. पथक गांधी नगर परिसरात सापळा लावुन थांबलेले असताना बातमीतील वर्णना प्रमाणे एक इसम येताना दिसला पथकाची खात्री होताच त्यास शिताफीने ताब्यात घेतले. पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) संतोष रघुनाथ धोत्रे, वय 25, रा. नागापुर, एमआयडीसी अहमदनगर असे सांगितले. त्याचेकडे नमुद गुन्ह्याबाबत चौकशी करता सुरुवातीस तो समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देवु लागला त्यास अधिक विश्वासात घेवुन बारकाईने चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवुन एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.
आरोपी नामे संतोष धोत्रे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर व ठाणे जिल्ह्यात मोक्का, दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, पोक्सो, गंभीर दुखापत, आर्म ऍ़क्ट असे गंभीर स्वरुपाचे एकुण-15 गुन्हे दाखल आहेत. ते खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. एमआयडीसी 258/2015 भादविक 427, 34
2. एमआयडीसी 310/2016 भादविक 324, 323
3. कळवा,ठाणे 149/2016 भादविक 279, 337, 338, 427 मो.वा.का.क. 184
4. एमआयडीसी 90/2017 दा.का.क. 65 ई
5. एमआयडीसी 613/2019 भादविक 395, 381, 201
6. एमआयडीसी 576/2019 भादविक 324, 323
7. तोफखाना 1393/2019 आर्म अक्ट 4/25
8. एमआयडीसी 255/2019 पोक्सो 7, 8, 11(4), 12
9. एमआयडीसी 173/2020 मपोका 135
10. तोफखाना 4613/2020 भादविक 392, 34
11. तोफखाना 7616/2020 भादविक 393, 34
12. एमआयडीसी 697/2020 भादविक 326, 324
13. एमआयडीसी 258/2021 भादविक 307
14. एमआयडीसी 206/2022 भादविक 450, 394,
15. एमआयडीसी 178/22 भादविक 307, 143, 147, 148, 149, 504, 506, 120 (ब) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1)(3)/135 व आर्म ऍ़क्ट 4/25 व मोक्का कलम 3 (1) (I), 3 (2), 3 (4)

सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्री. अजित पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

पोलीस अधीक्षक अहमदनगर
(यांचे करिता)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!