ब्रेकिंग

येत्या अंगारक चतुर्थीला श्री स्वयंभू गणपती आव्हाने बुद्रुक तालुका शेवगाव येथे भव्य दिव्य यात्रा महोत्सवास जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आव्हान आव्हाने गणपती ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

 

शेवगाव -(महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा )

श्री गणपती मंदिर आव्हाने बुद्रुक तालुका शेवगाव येथे गणपती अंगारकी चतुर्थी यात्रा उत्सव दिनांक १०-०१-२०२३ रोजी प्रारंभ होणार असून जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान गणपती ट्रस्ट अध्यक्ष व तसेच मंडळांनी आव्हान केले आहे.

शेवगाव तालुक्यातील तालुका भर नव्हे जिल्हाभर प्रसिद्ध असलेले आव्हाने गणपती ट्रस्ट हे असून हे देवस्थान पावन गणपती म्हणून अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेवगाव तालुका आव्हाने या गावचे नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे.

या गणपतीचे येणाऱ्या अंगारक चतुर्थीच्या निमित्ताने मोठा यात्रा उत्सव भरण्याचे आयोजन करण्यात आलेले असुण यात्रा उत्सवाच्या निमित्ताने जास्तीत जास्त भाविक भक्तांनी गणपती बाप्पाचे दर्शनचा लाभ घेऊन व यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन गणपतीचे अध्यक्ष व सर्व ट्रस्ट मंडळांनी केले आहे.

येणाऱ्या अंगारखि चतुर्थीच्या दिवशी सकाळी सात वाजता गंगा स्नान व अभिषेक आरती अध्यक्ष व सर्व सदस्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे माहिती अध्यक्ष व ट्रस्ट यांनी दिली आहे.

तसेच दुपारच्या सत्रामध्ये बारा वाजता फराळ महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तरी ट्रस्टच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की दर्शनाचा व महाप्रसादांचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा.

यावेळी श्रीकांत मधुकर जोशी देवा सोनई, दादासाहेब कांशीराम मस्के आव्हाने बुद्रुक, संजय गणपत चोथे आव्हाने बुद्रुक, मधुकर त्रिंबक वाणी बरहम्पुर एडवोकेट विजय गुलाबराव मुळे ढोरकिन पैठण, आदिनाथ पाटील मोहज तालुका पाथर्डी.

तसेच दुपारी बारा वाजता फराळ व्यवस्थापक दाते म्हणून वरील सर्व मंडळी असून तसेच सायंकाळचा महाआरती व अभिषेक श्री रायभान बन्सी नांगरे आव्हाने बुद्रुक तसेच सायंकाळच्या महाप्रसादाचे अन्नदाते म्हणून रायभान बन्सी नांगरे यांचा आसनार आहे.

मंगळवार दिनांक १०-०१-२०२३
ह.भ.प किशोर महाराज सूर्यवंशी लातूर यांचा जाहिर हरी कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे कीर्तनाच्या नंतर रात्री दहा वाजल्यापासून जागराचा कार्यक्रम आव्हाने व आव्हाने परिसरातील एकतारी भजनी मंडळाचा आयोजित करण्यात आलेला असून.
यामध्ये कीर्तनासाठी आव्हाने बुद्रुक बरामपुर, शहापूर, दिंडेवाडी वैष्णव सेवाश्रम, तसेच पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळी यांचे सहकार्य लाभणार आहे.

तसेच विशेष सहकार्य म्हणून पंचक्रोशीतील ग्रामस्थ युवक मंडळ तसेच गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आव्हाने बुद्रुक याचे आसनार आहे.

तसेच जास्तीत जास्त भावी भक्तांनी आव्हाने बुद्रुक येथील गणपती यात्रा उत्सववाचा लाभ घ्यावा असे आव्हान गणपती ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष समस्त कमिटी यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!