
घोगरगाव ,धनगरवाडी सबस्टेशनचा कार्यरंभ आदेश …..
आ शंकरराव गडाखांच्या पाठपुराव्याला यश.
नेवासा प्रतिनिधी – (महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा )
नेवासा तालुक्यातील घोगरगाव व
धनगरवाडी(सोनई) या दोन्ही वीज सबस्टेशन आ शंकरराव गडाख यांनी विशेष प्रयत्नपूर्वक कृषी वीज जोडणी धोरण 2020 अंतर्गत मान्यता मिळवली आहे.
घोगरगाव व धनगरवाडी (सोनई) या सबस्टेशनची क्षमता 5 एम व्ही आहे यामुळे घोगरगाव,जैनपुर,धनगरवाडी(सोनई),लोहोगाव, मोरयाचिंचोरे परिसरातील विजेची समस्या दूर होणार आहे.
सदर सबस्टेशनची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यरंभ आदेशही झाला असून यामुळे लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.
या दोन सबस्टेशनमुळे परिसरातील गावामधील शेतकरी, नागरिक यांची विजेची गैरसोय पुरती दूर होणार आहे यामुळे सदर सबस्टेशनच्या जागा आधीग्रहनासाठी आ शंकरराव गडाख यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. घोगरगाव,जैनपुर,धनगरवाडी(सोनई)लोहोगाव,मोरयाचिंचोरे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
…………………………………………………
आ शंकरराव गडाख यांनी विशेष प्रयत्नपूर्वक वीज सबस्टेशन मंजूर करून आणल्यामुळे विजेचा प्रश्न मार्गी लागणार आहे व विजेची गैरसोय दूर होणार.
विजेचा प्रश्न मार्गी लावून आ शंकरराव गडाख यांनी वचनपूर्ती केली.
जालिंदर शाळीग्राम ढेरे.
ग्रामस्थ.
लोहोगाव.