राजकिय

कुकाणा रस्ता कामाचा आमदार गडाख यांनी घेतला आढावा…

दर्जेदार कामासाठी अधिकाऱ्यांना केल्या सूचना...

कुकाणा रस्ता कामाचा आमदार गडाख यांनी घेतला आढावा…

दर्जेदार कामासाठी अधिकाऱ्यांना केल्या सूचना…….

कुकाणा –    (महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा )

कुकाणा ते दहिगावने रस्ता(तालुका हद्द) हे रस्ता काम प्रगतीपथावर असून शनी दि 25 फेब्रु 2023 रोजी आमदार शंकरराव गडाख यांनी या रस्ता कामाची पहाणी करून आढावा घेतला,
दोन वर्षांपूर्वी कोरोना सारख्या महामारीच्या काळात मंत्री असताना आपल्या पदाचा उपयोग करून 3 कोटी 52 लक्ष रुपये मंजूर करून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला, सरकारकडे निधीची कमतरता असतानाही वाहतूकचा मुख्य मार्ग असल्याने तसेच नागरिकांची गैरसोय होतं असल्याने काम तातडीने पूर्ण करून दर्जेदार काम करण्याच्या सूचना आमदार गडाख यांनी केल्या.अनेक दिवसांपासून सदर रस्ता काम प्रलंबित होते आमदार शंकरराव गडाख यांनी विशेष प्रयत्न करून सदर काम मंजूर करून आणल्याने रस्ता काम मार्गी लागणार आहे व नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.
रस्ता काम गुणवत्तापूर्ण पद्धतीने व्हावे यासाठी मी कटिबद्ध आहे यात नागरिकांही सूचना कराव्यात असेही गडाख म्हणाले पुढील काळातही कितीही अडचणी आल्या तरी विकासासाठी कटिबद्ध आहे असेही आ गडाख म्हणाले या प्रसंगी अंतरवाली, पाथरवाला ,नांदूर शिकारी,सुकळी ग्रामस्थांच्या वतीने आमदार शंकराव गडाख यांचा सत्कार करण्यात आला, या प्रसंगी मा. आमदार पांडुरंग अभंग, ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक देसाई देशमुख, मुळा कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर, व्हाईस चेअरमन कडुबाळ कर्डीले, शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख मछिंद्र म्हस्के ,भैय्यासाहेब देशमुख, भाऊसाहेब मोटे,माजी उपसभापती अशोकशेठ मंडलिक,मार्केट कमिटीचे उपसभापती वसंतराव देशमुख, माजी सरपंच एकनाथराव कावरे,
माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय खाटीक,
नारायणराव म्हस्के,संतोष म्हस्के, सोपान घोडेचोर,नानाभाऊ नवथर,
,बाळासाहेब कचरे (इंजिनियर),दौलतराव देशमुख,सरपंच संदीप देशमुख,उपसरपंच सोमनाथ कचरे भाऊसाहेब फोलाने बबनराव पिसोटे, अजय रिंधे,अशोकराव गर्जे,चिलेखनवाडी येथील सरपंच भाऊसाहेब सावंत, चेअरमन संजय सावंत पाथरवला सरपंच हरिभाऊ थोरे,सुनील वाबळे,
महेश उगले, प्रशांत देशमुख, मुसा इनामदार, राहुल जावळे, समीर पठाण,राजेंद्र म्हस्के,भानुदास कावरे,विलास लिपने, सचिन साबळे, बाळासाहेब म्हसरूप, सरपंच जालिंदर तुपे,शुभम देशमुख, संदीप लिपने, संतोष लिपने,
बाबासाहेब आतकरे,आदीसह ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार सोमनाथ कचरे यांनी मानले.
……..,,……,……..,.,.,……..,……………….
मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून आणून रस्ता कामे मार्गी लावण्यासाठी आ शंकरराव गडाख यांनी विशेष प्रयत्न केल्याने कुकाना व परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
……….,….,……………………………………

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!