*पैलवान बॉईज कडून ऐतिहासिक बैलगाडा शर्यत संपन्न*

*पैलवान बॉईज कडुन ऐतिहासिक बैलगाडा शर्यत संपन्न*
पैलनान बॉईज प्रतिष्ठान आयोजित ऐतिहासिक बैलगाडा शर्यत नागापुर शिवारात गंगागिरी महाराज सप्ताह मैदानात पार पडला या शर्यतीत स्पर्धक गाड्यांनी तालुक्यात सर्वांत जास्त या स्पर्धेत सहभाग नोंदवला
सौंदाळा लोकनियुक्त सरपंच श्री शरदराव आरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पै,स्वप्निल बोधक पै,ऋषी वाबळे पै शुभम गर्जे यांनी सदरची स्पर्धा आयोजित केली होती
या स्पर्धेत पुणे नाशिक औरंगाबाद धुळे येथुन बैलगाडा चालकांनी सहभाग नोंदवला
स्पर्धेत १)पहिले बक्षीस वैजापुर येथील पंकज गुजर व सलाबतपुर येथील पापाभाई शेख बरोबरीत सुटले आहे ४१००० रु रोख व सायकल
दुसरे बक्षीस २) ३१००० व सायकल ब्राम्हणी येथील सुभाष गोरे यांनी माळी घोगरगाव येथील गाडीला हरवुन पटकावले ३)तिसरे बक्षीस संक्रापुर येथील रवि ठोक यांनी नाशिक येथील खंडागळीतील गाडीला हरवुन पटकावले २१००० रु व सायकल ४)चतुर्थ बक्षीस देवळ्या ग्रृप उंबरे येथील शरद मोरे यांनी मालखेडा येथील गाडीला पराभुत करुन पटकावले ११००० रु व सायकल ५) पाचवे बक्षीस भानसहिवरा येथील किरण निपुंगे यांनी तुर्काबाद येथील गाडीला हरवुन पटकावले ५००० रु व सायकल तसेच फॅन,दुध कॅन,पाणी जार,बादली, अशा बक्षीसांचा आयोजकांकडुन वर्षाव करण्यात आला
यावेळी सोपान महापुर,प्रेमचंद बोधक, किशोर मिसाळ, सचिन आरगडे, दानियल मकासरे,बाळासाहेब बोधक,मंगेश गव्हाणे,प्रकाश शिंदे,विकास जावळे,बंडु घोगाणे,बाळु खांदे,गणेश आरगडे,सर्जेराव खरात,प्रशांत दळवी,रमेश पुंड,दत्तु पंडित,संतोष गुजर यांचेसह सौंदाळा,भेंडा नागापुर देवगाव खुणेगावसह तालुक्यातील बैलगाडा शर्यत शौकिन हजर होते