कुकाणा येथील जि. प. शाळेतील चिमुकल्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात..
बाल कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली...
कुकाणा येथील जि. प. शाळेतील चिमुकल्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
कुकाणा प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कुकाणा शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्साहात पार पडले. चिमुकल्यांच्या या कलेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे उद्घाटन ,कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ.लताबाई विठ्ठलराव अभंग यांनी केले, प्रमुख पाहूणे सौ.राजनंदिनी मंडलिक,मा.सभापती पं.स.नेवासा, अशोकराव मंडलिक माजी.सभापती पं सं.नेवासा,उपसरपंच सौ.शुभांगी सोमनाथ कचरे , मा.सरपंच एकनाथ कावरे, दौलतराव देशमुख, इंजि.बाळासाहेब कचरे,शिक्षक बँकेचे रामेश्वर चोपडे,माजी उपसरपंच भाऊसाहेब फोलाणे,ग्रामपंचायत सदस्या सुजाता देशमुख, शिवगंगा सदावर्ते,
गटशिक्षण अधिकारी शिवाजीराव कराड राहुल जावळे इंनूस नालबंद हे व्यासपीठावर उपस्थित ,होते. देशभक्तीपर गीत,आदिवासी नृत्य, बळीराजाचे शेतकरी गीत व महाराष्ट्राची अस्सल मराठी लावणी,गवळणी, नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळाली. या लहान वयातच चिमुकल्यांचा कलागुणांना वाव मिळतो. म्हणून पालकांनीही आपल्या पाल्यांना संधी देऊन प्रोत्साहन द्यावे असे प्रतिपादन जेष्ठ नागरिक विष्णुपंत पवार यांनी केले.
जिल्हा परिषद प्राथमिक कुकाणा च्या मैदानावर सन २०२३ चा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.भावसाक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, वाहन विवेक, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर मुलांनी सुंदर सादरीकरण केले. जि.प.शाळाचे मुख्याध्यापक सुनिल जाधव शिक्षक व शिक्षिका मोलाचे सहकार्य केले. या वेळी कुकाणा ता.नेवासे येथील दानशूर व्यक्तींनी रोख रक्कम बक्षिस, एलईडी, पाणी फिल्टर, वर्गखोल्या डिजिटल करण्यासाठी शालेय उपयोगी साहित्य भेट स्वरुपात उपलब्ध करुन दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पत्रकार सोमनाथ कचरे, उपाध्यक्ष प्राप्तीताई बोरुडे,सदस्या राजश्री शिंदे पूनम मानकेश्वर,मनीषा लोंढे, निशा गोर्डे, शबाना शेख,रोहिणी म्हस्के,वैशाली भूमकर,
किरण शिंदे, अरुण फोलाने, संजय वाघ,सुरज जावळे ,देविदास गरड,इक्बाल इनामदार, रज्जाक, मुसा इनामदार,,पत्रकार सुनील गर्जे सुनील पंडित नवाब शहा, जयकिसनवाघ,आदींनी अभिनंदन व कौतुक केले.कार्यक्रामाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक सुनिल जाधव यांनी प्रास्ताविक करुन शालेय उपक्रमांची माहीती दिली या वेळी शिक्षक विजय तवार ,ताराचंद कोकाटे,पोपट शिंदे,राधाकिसन कदम,श्रीमती सिमा सोनावणे, शारदा टेकाडे,कल्पना पवार,सुमन पाटोळे, ज्योती चांदणे,कामिनी बायस, सारीका हाराळे, शरद तांबे, शकूर शेख, समीर शेख,
आदी शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते सूत्रसंचालन अशोक राठोड तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ कचरे यांनी आभार मानले. या स्नेहसंमेलन करीता सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संचालक, प्रतिष्ठित व्यापारी, उद्योजक, डाॅक्टर कुकाणा विद्यालयातील सेवकवर्ग यांच्यासह पालक, ग्रामस्थ, परिसरातील जिल्हा परिषद शाळेमधील केंद्र प्रमुख, शिक्षक उपस्थित होते