वात्सल्य शनीशिंगणापूर संघाने पटकवला सोनईचा नामदार चषक.
उदयन गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा संपन्न.

वात्सल्य शनीशिंगणापूर संघाने पटकवला सोनईचा नामदार चषक.
उदयन गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली
स्पर्धा संपन्न.
सोनई प्रतिनिधी
युवा नेते उदयन गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त
उदयन गडाख युवा मंच, यश ग्रुप,गुड मॉर्निंग क्रिकेट यांच्या वतीने मुळा कारखाना सोनई ता नेवासा आयोजित क्रिकेट स्पर्धा 10 मार्च 2023 ते 17 मार्च 2023 या कालावधीत संपन्न झाली
यामध्ये नेवासा तालुक्यातील 16 विविध नामवंत क्रिकेट संघ सहभागी झाले होते.
अतिशय रोमहर्षक वातावरणात चुरशीचे सामने खेळवण्यात आले.
दररोज होणाऱ्या मॅचेस पाहण्यासाठी नेवासा तालुक्यातील गावा गावातून मोठया संख्येने तरुण व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.
जयहिंद चांदा व वात्सल्य शनिशिंगणापूर यांच्यामध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्याची सुरवात
कु नेहल प्रशांत गडाख यांच्या हस्ते नाणेफेक करून करण्यात आले याप्रसंगी मा सभापती सौ सुनिताताई गडाख,मा सभापती सुनीलराव गडाख यांच्या उपस्थितीत हा सामना खेळवण्यात आला.
ही फायनल मॅच वात्सल्य इलेव्हन शनी शिंगणापूर यांनी जिंकली
त्यांना उदयन गडाख मित्रमंडळाच्या वतीने 51 हजार रु रोख व प्रथम पारितोषिक
देण्यात आले तसेच द्वितीय क्रमांचे यश ग्रुप सोनईच्या वतीने जय हिंद चांदा यांना 31 हजार रु रोख पारितोषिक तसेच तृतीय क्रमांकाचे 21 हजार रु रोख पारितोषीक निलांजन शनी शिंगणापूर यांना मा उपसभापती किशोर जोजार यांचेकडून
तसेच चतुर्थ क्रमांचे 15 हजार रु रोख पारितोषिक शिवनेरी देडगाव सोनईचे सरपंच धनंजय वाघ
15 हजार रु रोख सोनईचे सरपंच धनंजय वाघ यांच्या वतीने याप्रसंगी देण्यात आले.
बक्षीस वितरण मा सभापती सुनीलराव गडाख,मा सभापती सुनीताताई गडाख,कु नेहल प्रशांत गडाख,राजेंद्र गुगळे,उदय पालवे,दत्तात्रय गडाख,बाळासाहेब सोनवणे,प्रकाश शेटे,संतोष दरंदले,धनंजय वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.
मॅन ऑफ दि सिरीज सौरभ सोनवणे यांना एल ए डी टीव्ही सुनील तागड यांच्या वतीने देण्यात आली.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व आयोजकांचे याप्रसंगी उदयन गडाख युवा मंचच्या वतीने ट्रॉफी व कवडसे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
उपस्थितांचे आभार उदय पालवे यांनी मानले.15 हजार नागरिकांनी ही स्पर्धा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेतला.
फोटोओळी…
सोनई ता नेवासा नामदार चषक क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण करतांना सुनीलराव गडाख,सौ सुनिताताई गडाख,कु नेहल गडाख आदी.
चौकट…
मुख्य मॅच संपल्यानंतर प्रेक्षक व खेळाडू ‘आम्ही नेवाश्याची मुले’ या गीतावर थिरकले.
चौकट…
तरुण मित्रांनी वाढदिवसाच्या निमित्त नामदार चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करून तालुक्यातील खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले यामुळे तालुक्यात अनेक दर्जेदार क्रिकेट खेळाडू तयार होतील.
उदयन गडाख.
उपाध्यक्ष मुळा एज्युकेशन सोसायटी सोनई.