कृषीवार्ता

महालक्ष्मी हिवरे येथे ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यक्रम आतंर्गत कृषिदुतांचे आगमन

नेवासा प्रतिनिधी -:

महालक्ष्मी हिवरे, ता.नेवासा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी,अंतर्गत असलेल्या मुळा एज्यूकेशन सोसायटी चे कृषी महाविद्यालय सोनई येथील ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यक्रम आतंर्गत कृषिदुतांचे आगमन झाले.या निमित्ताने महालक्ष्मी हिवरे गावाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

हे कृषिदूत पुढील दहा आठवडे गावमध्ये राहून विविध कार्यक्रम राबवणार आहेत. ऋषिकेश गणेश डोंगर, विशाल बाळासाहेब गांगर्डे,कैवल्य अशोक देशमुख, सुरज शिवाजी गोंदवले, अशोक सुखदेव खराडे, सौरभ रविंद्र जाधव या कृषिदुतांचे नावे आहेत .यावेळी मा. सरपंच श्री. सिमन जाधव, व ग्रामपंचायत सदस्य. अंबादास चौधर आणि श्री. बाबासाहेब खाडे, श्री. अनिल गायके आणि कृषी सहायक श्री. रूपेश पवार उपस्थीत ग्रामस्थ श्री.किरण केदार, संजय गायके, श्रीहरी गायक, माऊली गंगावणे आदी प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

तसेच या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ हरिभाऊ मोरे सर तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. दरंदले.एस. एन सर यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!