राष्ट्रीय भारुडकार हमीद अमीन सय्यद यांचे मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर भारुडाचे प्रक्षेपण….
राष्ट्रीय भारुडकार हमीद अमीन सय्यद यांचे मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर भारुडाचे प्रक्षेपण
गुढीपाडवा विशेष कार्यक्रमात लोककलांचे सादरीकरण
नेवासा प्रतिनिधी,- (काकासाहेब नरवणे)
मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बुधवार दिनांक 22 मार्च गुढीपाडवा नववर्षाच्या प्रारंभ निमित्त मुंबई दूरदर्शन ने उत्सव लोककलांचा या कार्यक्रमाचे आयोजन केले असून यामध्ये ,भारुड ,पोवाडा ,गोंधळ ,पोतराज ,लावणी ,आदिवासी नृय,या विविध लोककलांचे सादरीकरण होणार असून या कार्यक्रमाचे प्रसारण मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर बुधवार दिनांक 22 मार्च रोजी दुपारी दोन वाजता व पुनःप्रसारण रात्री आठ वाजता संपन्न होणार आहे यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या मराठी नववर्षाच्या दिनानिमित्त मुंबई दूरदर्शन चा हा एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध राष्ट्रीय भारुडकार हमीद अमीन सय्यद – भारुड ,शाहीर शिवाजीराव पाटील -पोवाडा शाहीर विलास अटक- गोंधळ, विजया पालव यांची लावणी, तसेच आदिवासी नृत्य इत्यादी लोककलांचे सादरीकरण गुढीपाडव्याच्या निमित्ताने होणार आहे राष्ट्रीय भारूडकार हमीद सय्यद यांना भाऊसाहेब मनाळ ,प्रमोद दळवी,दीपक काळे, ज्ञानेश्वर गुजर, गणेश बैरागी, संतोष गायकवाड, बालकलाकार जिशान सय्यद यांनी साथसंगत केली असून या कार्यक्रमाचे निर्माता दिग्दर्शक मलकराज पंचभाई सर असून निवेदन नयन जाधव यांचे आहे , हमीद सय्यद दूरदर्शन चे मान्यताप्राप्त कलाकार असून धिना धिन धा, लोकोत्सव, लोकभजन,प्रभात कट्टा, भारत निर्माण,माझी माय, मैत्र हे शब्द सुरांचे , आशा अनेक दूरदर्शनच्या कार्यक्रमात त्यांनी भारुड सादर केले आहे तसेच झी टॉकीजवर” मन मंदिरा “गजर भक्तीचा या लोकप्रिय कीर्तन मालिकेतही त्यांनी भारुड सादर केले आहे.
मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बुधवार दिनांक 22 मार्च गुढीपाडवा नववर्षाच्या प्रारंभ निमित्त
या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा.भारूडकार हमीद सय्यद यांनी केले.