*सौंदाळा ग्रामपंचायतीची कन्यादान व भगिनी योजना*

सौंदाळा ग्रामपंचायतीची कन्यादान व भगिनी योजना
नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीने १८ वर्ष पुर्ण असलेल्या गावातील मुलीच्या लग्नात संसार उपयोगी साहित्य खरेदी करीता ५००० रु चा धनादेश देण्याचा निर्णय घेतल्याचे लोकनियुक्त सरपंच सौ प्रियंका शरदराव आरगडे यांनी सांगितले
सौंदाळा ग्रामपंचायतीने मुलींना प्रोत्साहन देणेसाठी मुलीच्या विवाहात वर पित्याचा आर्थिक भार थोडासा कमी करण्याच्या हेतुने संसार उपयोगी वस्तु खरेदी करीता ५००० रु चा धनादेश देण्याचा निर्णय घेतला आहे
या बरोबर गावातील तीन अपंग मुले हे रुग्णशय्येवरच पडुन असतात त्यांच्या औषधोपचार करण्यासाठी १००० रु महिना देण्याचे निर्णय केला असुन इतर २२ अपंगांना २००० रु अर्थसहाय्य केले जाणार आहे
तसेच सौंदाळा गावातील ९५ विधवा महिलांना दरवर्षी “भगिनी योजना” अतर्गत १००० रु अर्थसहाय्य देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे
यावेळी उपसरपंच सौ लताबाई सोन्याबापु आरगडे, सचिन आरगडे,बाळासाहेब बोधक,जगन्नाथ आढागळे,सौ सविता रेवननाथ आरगडे याचे सह ग्रामसेवक श्री आयुब शेख हजर होते
ग्रामपंचायतीने घेतलेल्या अभिनव उपक्रमा बाबत मा,मंञी श्री शंकरराव गडाख साहेब व मा,आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी अभिनंदन केले आहे