सोनईतील बालाजी मंदीरात पोर्णिमा महापुजा सोहळा उत्साहात संपन्न

सोनईतील बालाजी मंदीरात पोर्णिमा महापुजा सोहळा उत्साहात संपन्न
सोनई(वार्ताहर)सोनई येथील पुरातन व्यंकटेश बालाजी देवस्थान येथे आज चैत्री उत्सव निमित्त झालेल्या पोर्णिमा महापुजा व आरती सोहळ्यास भाविकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.पालखी मिरवणूक,दंडवत,देवता पूजन, मानाचे श्रीफळ आदी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.
उत्सव मंडपात देवस्थानचे विश्वस्त बंडू गोसावी,जगदीश गोसावी, व्यवस्थापक राहुल लोहकरे यांच्या उपस्थितीत मुख्य देवतांचा मानसन्मान करण्यात आला.
दिपक व किरण दरंदले यांच्या हस्ते अभिषेक करुन आरती सोहळा झाला. अनिल दरंदले, अमोल दरंदले व राहुल दरंदले यांच्या हस्ते बालाजीची आरती झाली.आरती मंडळ,ब्राम्हण सेवा संघ व विविध तरुण मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
महापुजा व आरती सोहळ्यानंतर
उपविभागीय आधिकारी संदीप मिटके,सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी,सोनईचे सरपंच धनंजय वाघ,माजी पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र गुगळे, माजी सरपंच राजेंद्र बोरुडे, दादासाहेब वैरागर,किशोर कोतकर,राजेंद्र कोळसे,राजाराम कार्ले,संतोष सोनवणे,संभाजी चौधरी आदींनी दर्शनाचा लाभ घेतला. संजय जोशी देवा यांनी पौरोहित्य केले.महाप्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता झाली पत्रकार सुनिल दरंदले व सुधीर दरंदले यांनी आभार मानले.
——————————-